आतापर्यंत तुम्ही टीव्हीवर सुपरमॅन स्पायडर मॅनच्या अनेक कथा ऐकल्या आणि पाहिल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला रायबरेलीमधील असाच एक स्पायडर मॅन दाखवणार आहोत. होय, असा स्पायडर-मॅन जो कित्येक फूट उंचावर तारे धरून चालत आहे, जणू तो मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला आहे आणि मनमोकळेपणे रस्त्यावर फिरत आहे. (Raebareli: Negligence of Indian Railways, employees climbing on power lines without any safety equipment)
हा व्हिडीओ रायबरेलीच्या भारतीय रेल्वेमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आहे, जो विद्युत लाईनचं रुंदीकरण आणि लाईन दुरुस्त करण्याचं काम करतो. हे लोक विजेच्या खांबांवरील तारांवर चालत आहेत
व्हिडीओ पाहा
ही व्यक्ती रायबरेली ते प्रयागराज जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक लाईनवर चढून इलेक्ट्रॉनिक वायर दुरुस्त करत आहे, पण त्यांचा निष्काळजीपणा बघा, त्यांनी ना कुठली सुरक्षेची काळजी घेतली आहे, ना सेफ्टी गार्ड सारखे काहीही घातलंय, ना रेल्वेचे कायदे यांना माहीत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत रायबरेली स्टेशनचे अधीक्षक राकेश कुमार यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र रेल्वेमध्ये अद्यापही सुरक्षेबाबत कुठलीही काळजी घेतली जात नाही हे यावरुन स्पष्टपणे दिसते.जेव्हा अशी दृष्यं समोर येतात, तेव्हा अधिकारी हात वर करतात, बोलण्यास नकार देतात. पण जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा बदल केले जात असल्याचं सांगितलं जातं. पण होत काहीच नाही अशी परिस्थिती आहे.
हेही पाहा: