नियम मोडणं (Breaking Rules) हा प्रकार काही लोकं जाणून बुजून करतात. रेल्वे स्टेशनवर हा प्रकार खूप दिसतो. रीतसर पलीकडे जायचा मार्ग असताना सुद्धा लोकं कधी कधी रेल्वे रुळावरून पलीकडे जातात. आळशी असतात की मजा येते हे काय अद्याप समजू शकलेलं नाही. पण बरेचदा हा स्टंट जीवावर बेततो. या घटनांचे व्हिडीओ सुद्धा प्रचंड व्हायरल (Viral Video Of Railway Stations) होतात. कधी अशा लोकांना आजूबाजूचे नागरिक (Citizens) वाचवतात, कधी त्यांचं नशीब त्यांना वाचवतं तर कधी स्टेशन वरील कर्मचारीच त्यांना वाचवतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ही महिला मरता मरता वाचलीये.
या व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मखाली रेल्वे रुळावर एक महिला उभी असल्याचं पाहायला मिळतंय. ती प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करतीये.
प्लॅटफॉर्मवर चढताना ती इतकी मग्न आहे की तिला रेल्वेचा देखील आवाज येत नाही. ती तिच्याच नादात आहे. थोड्या वेळाने तिथे वेलफेयर इंस्पेक्टर येतो आणि तिला पटकन प्लॅटफॉर्मवर खेचतो.
Firozabad, UP | We spotted a woman crossing the railway line as a train neared. While I ran from one end, another railway official ran from the other. He was able to get to her just in time. She was saved: GRP Constable, Shivlal Meena pic.twitter.com/t5XwvTyajQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 9, 2022
ही महिला थोडक्यात वाचते. वेलफेयर इंस्पेक्टर शिवलाल मीना यांचं प्रसंगावधान या महिलेचा प्राण वाचवतंय. एखाद्या हिरो सारखी वेलफेयर इंस्पेक्टर या व्हिडीओ मध्ये एंट्री मारताना दिसतायत. ANI वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केलाय.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून लोक त्या अधिकाऱ्याचं कौतुक करून थकत नाहीत.
सीसीटीव्ही फुटेज हजारो वेळा पाहिले आणि लाइक केले गेले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या.