Video | 8 फुटांची मगर थेट घरात घुसली, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

| Updated on: Aug 04, 2021 | 5:17 PM

या व्हिडीओमध्ये एक मगर थेट एका घरात घुसल्याचे आपल्याला दिसत आहे. नंतर मगरीला पकडताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घ्यावे लागलेले परिश्रम या व्डिडीओमध्ये दाखवण्यात आले आहेत.

Video | 8 फुटांची मगर थेट घरात घुसली, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !
CROCODILE VIRAL VIDEO
Follow us on

मुंबई : मगर म्हटलं की आपण शहारुन झालो. मगरीच्या तावडीत एकदा सापडलं की सुटका करुन घेणे मुश्किल असते. कदाचित याच कारणामुळे आपण मगरीला घाबरतो. मगरीचे अनके व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ समाजमाध्यमावर चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील हा व्हिडीओ असून यामध्ये एक मगर थेट घरात घुसल्याचे आपल्याला दिसत आहे. नंतर मगरीला पकडताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घ्यावे लागलेले परिश्रम या व्डिडीओमध्ये दाखवण्यात आले आहेत. (Rajasthan Savaimadopur Crocodile enters in house video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तब्बल आठ फुटांची एक मगर दिसत आहे. ही मगर एका घरात घुसलीय. मगरीने थेट घराकडे मोर्चा वळवल्यामुळे लोक चांगलेच घाबरले आहेत. ही मगर घरात नेमकी कशी आली याबद्दल कोणालाही कल्पना नाही. मात्र, मगरीने हल्ला करु नये म्हणून त्या घरातील लोक थेट घराच्या भिंतीवर जाऊन बसले आहेत.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली

मगर घरात घुसल्याचे समजताच कुटुंबीयांनी वन विभागाशी संपर्क साधला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत मगरीला पकडण्याचे काम केले आहे. आठ फुटांच्या या मगरीला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने मगरीला घरातून फरफटत बाहेर काढलं आहे. तसेच मगरीला एका गाडीमध्ये टाकून सुरक्षित स्थळी सोडून दिले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, एका घराच्या आवारामध्ये मोठ्या दिमाखात फिरत असलेली मगर पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या व्हिडीओला ट्विटरवर Kirandeep या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

पुण्यातील ‘ती’ मद्यधुंद तरुणी आधी रस्त्यावर झोपली, नंतर लोकांना शिवीगाळ केली, पोलीस दिसताच पोबारा

#Justiceforcabdriver: कॅब ड्रायव्हरला मारणाऱ्या तरुणीविरोधात सोशल मीडियावर रोष, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं ?

“व्वा मोदीजी व्वा ! गॅस महागल्यामुळे नवणीत राणांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ” रुपाली चाकणकरांची खोचक टीका

(Rajasthan Savaimadopur Crocodile enters in house video went viral on social media)