मुंबई: तुम्ही अनेकदा साधूंना ध्यान लावून बसलेले पाहिले असेल, ते कुणाशी जास्त बोलत नाहीत. एखादा भक्त त्यांच्याकडे गेला तर त्यांचा ते आशीर्वाद घेतात आणि तिथून निघून जातात. काही लोक साधूंशी त्यांच्या जीवनातील मूलभूत मंत्रांबद्दल बोलतात. मात्र काही लोक असे आहेत जे साधूबाबांबद्दल कुतूहल दाखवतात. काही साधू स्वत:बद्दल सांगतात, तर बहुतेक शांत राहणे पसंत करतात. एका साधूबाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि ही क्लिप पाहण्याचे एकच कारण आहे – ते म्हणजे त्यांची रॅपिंग.
साधू बाबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक साधू आपल्या बसलेला असतो आणि समोर एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर येतो. तो साधू बाबांना विनंती करतो की त्यांना स्वतःबद्दल काहीतरी सांगावं. साधूबाबांनी आपल्या बद्दल सांगण्यासाठी रॅपिंगचा आधार घेतला. आधुनिक युगात साधूबाबा कोणाच्याही मागे नाहीत आणि त्यांनी आपल्या नव्या स्टाईलने लोकांची मने जिंकली. आशिष भगत नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बाबा आझाद खान.’
साधूबाबांनी जेव्हा गाण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या युजरला माहित नव्हतं की ते एवढं चांगलं रॅपिंग करू शकतात. बाबा कुठलाही संकोच न बाळगता सतत आपल्या हावभावांनी लोकांना प्रभावित करतायत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्स कौतुक करायला थकत नाहीत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.