तस्मानिया : ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर माशाची एक दुर्मिळ प्रजात आढळून आली आहे. तस्मानियाच्या नैऋत्य किनार्याजवळील खोल समुद्रात हा मासा आढळून आला आहे. या माशाला गुलाबी हॅन्डफिश म्हणून ओळखले जाते. हा मासा एंग्लर फिश कुळातला सदस्य आहे. याचे आतापर्यंत समुद्रात केवळ पाच वेळाच दर्शन झाल्याची नोंद आहे. हा मासा 1999 साली होबार्टच्या तस्मान द्वीपकल्पांवर आढळून आला होता. त्यानंतर तो तब्बल 22 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये तस्मानियाच्या नैऋत्य किनाऱ्यावर आढळून आला आहे.
या दुर्मिळ माशाच्या अस्थित्वाबाबत शास्त्रज्ञांकडून शोध सुरू होता. याचदरम्यान हा मासा आढळून आला आहे. हा मासा नामशेष झाल्याचे यापूर्वी तज्ज्ञांनी म्हटले होते. मात्र हा मासा पुन्हा एकदा आढळून आला आहे. याबाबत बोलताना स्ट्रीप ट्रम्पटर यांनी म्हटले आहे की, गुलाबी हॅन्डफिश ही माशाची अंत्यंत दुर्मिळ अशी प्राजात आहे. हा मासा एंग्लर फिश कुळातला सदस्य आहे. माशांची ही प्रजात अत्यंत लाजाळू असते, त्यामुळे हे मासे खोल समुद्रात राहाणेच पसंत करतात. मात्र विविध कारणांमुळे या माशांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाली. आज माशांची ही प्रजात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या माशांचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
गुलाबी हॅन्डफिशचे खोल समुद्रामध्ये वास्तव्य असते. या माशाचा रंग हा गुलाबी असतो, तसेच त्याच्या दोन्ही बाजूचा भाग हा हातासारख्या दिसतो म्हणून या माशाला गुलाबी हॅन्डफिश असे म्हणतात. हा मासा समुद्रात 120 मीटर खोलीवर आढळून येतो. हा मासा अंत्यंत लाजाळू असल्याने हा तसा लगेच दृष्टीस पडत नाही. या जातीचे काही मोजके मासे जगात शिल्लक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान या आगळ्यावेगळ्या प्रकारच्या माशावर संशोधन सुरू असल्यी माहितीही त्यांनी दिली.
VIDEO : वरमाला घालताना नवरदेवाने दिली वेगळीच पोज! व्हिडिओवर हजारो तरुणी फिदा…
Video : पहिल्यांदा कोल्ड्रिंग पिणाऱ्या चिमुकलीचे भन्नाट रिअॅक्शन पाहा, व्हिडिओ व्हायरल
राजाला राणी सव्वाशेर, 3 बॉडीगार्डसोबत संबंधांचा धुराळा, 5 हजार कोटीच्या घटस्फोटाची ‘आतली’ गोष्ट