‘सामी सामी…’ गाणं (Sami Sami Song)आवडतं का? आवडणारच! जबरदस्त गाणं आहे. डान्स स्टेप्स तर काय वाढीव आहेत त्या गाण्याच्या. साऊथच्या (South Movie) काही गाण्यांची नशाच वेगळी आहे बरं का. बरीच गाणी बराच काळ इंटनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालतात. नुसती गाणीच काय, बरेचदा सिनेमा, त्यातले हिरो हिरोईन, त्यांचे डायलॉग्स, त्यांचे लुक्स. सगळंच, अगदी सगळंच बराच काळ इंटरनेटवर नंबर वन असतात. आधी तो ‘मैं झुकेगा नहीं…’ हा डायलॉग आला त्याची नशा संपते ना संपते तोच सामी सामी सुरु झालं! लोकं गाणं लागले की डायरेक्ट नाचायला सुरवात करतात. अशी या गाण्याची नशा! कालपासून इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत होता ज्यात एक छोटीशी क्युट मुलगी “सामी सामी” गाण्यावर नाचतीये. हा व्हिडीओ व्हायरल होत होत रश्मिका मंदाना पर्यंत जाऊन पोहचला. रश्मिका मंदानाने या मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त (Rashmika Mandana Reacts) केली. तिने तिच्या ट्विटर हॅन्डलवर ही पोस्ट शेअर केलीये.
हा व्हिडिओ 31 सेकंदाचा आहे. बहुतेक ही एखादी शाळा असावी. ‘सामी-सामी’ हे गाणं मोठ्या आवाजात वाजताना ऐकू येतं. बाकीची मुलं उड्या मारताना नाचताना दिसतायत.
कॅमेऱ्यासमोरची एक मुलगी रश्मिका मंदानाच्या स्टेप्स इतक्या सुंदरपणे फॉलो करते की बघणारे तिच्याकडे टक लावून बघत राहतात. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल तुम्ही पैज लावा.
या छोटुश्या मुलीचे हावभाव खूप क्यूट असतात. हा व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला हे समजू शकलेले नाही. या…आधी हा व्हिडीओ बघू!
Maaaaadddddeeeeee myyyyy daaaaaay.. I want to meet this cutie..?
how can I? ? https://t.co/RxJXWzPlsK— Rashmika Mandanna (@iamRashmika) September 14, 2022
अभिनेत्री रश्मिका मंदानाने काल 14 सप्टेंबरला या चिमुकलीचा डान्स व्हिडिओ शेअर करत लिहिले- “मेड माय डे… मला ह्या क्यूटीला भेटायचे आहे… मी तिला कुठे भेटू शकते?”
या व्हायरल क्लिपला जवळपास 18 लाख व्ह्यूज आणि 92 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक ट्विटर युझर्सनी यावर प्रतिक्रिया देत लिहिले की, “या मुलीनेही आमचा दिवस छान बनवला आहे.” काही युझर्सनी मुलीचा डान्स परफेक्ट आणि क्यूट असल्याचं सांगितलं आहे.