मुंबई: जुगाड ही आपल्या देशात असणारी खूप कॉमन गोष्ट आहे. लोकं अनेक गोष्टींमध्ये जुगाड करतात. हे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. बरेचदा तर मोठमोठे लोक हे व्हिडीओ स्वतः आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर पोस्ट करत असतात. आपल्याला असे व्हिडीओ बघून कधी धक्का बसतो तर कधी खूप हसू येतं. जुगाड व्हिडीओमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरा चा जुगाड पाहिला, वॉशिंग मशीनचा जुगाड पाहिला. आनंद महिंद्रा सुद्धा असे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असतात. जुगाड हा खरं तर पैसे वाचवायचा उत्तम मार्ग आहे. थोडीशी शक्कल लढवायची, गोष्टी इकडच्या तिकडे करायच्या आणि जुगाड झालाच म्हणून समजा! आज आम्ही जो जुगाडाचा व्हिडीओ घेऊन आलोय तो पोस्ट केलाय अभिनेता रितेश देशमुखने. हा व्हिडीओ बघून तुम्हाला हसूच आवरणार नाही.
हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. एक माणूस गाडी चालवतोय. या दुचाकीच्या बाजूला जिथे दुचाकीची डिक्की असते तिथे दुधाचं कंटेनर आहे. या दुधाच्या कंटेनर मध्ये या माणसाने त्याच्या बाळाला ठेवलंय. व्हिडीओ जसा पुढे जातो आपल्याला त्या दुधाच्या कंटेनर मध्ये एक छोटंसं बाळ बसलेलं दिसतं. हे बघून एक हलकी स्माइल आपल्या चेहऱ्यावर येते. हे लहान मूल इतकं शांत आणि आनंदाने या कंटेनर बसलंय की तुम्हालाही ते बघून छान वाटेल.
Jugadu Baap…. pic.twitter.com/bCe1Eurs32
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 16, 2023
हा व्हिडीओ अभिनेता रितेश देशमुखने शेअर केलाय. असा जुगाड तुम्ही आजवर पाहिला नसेल. अहो नुसता जुगाडच काय तुम्ही दुधाच्या कंटेनरचा असा वापर आजवर पाहिला नसेल. रितेश देशमुखने सुद्धा या व्हिडीओचं खूप कौतुक केलंय. व्हिडिओमध्ये दिसतंय की हा माणूस बाजरात कुठेतरी जातोय मग लहान मुलाला कुठे बसवायचं तर त्याने ही शक्कल लढवलीये. या व्हिडीओचं खूप लोकांनी कौतुक केलंय. अनेकांना हा व्हिडीओ आवडलाय. रितेश देशमुखने या व्हिडीओला, “जुगाडू बाप” असं कॅप्शन दिलंय.