मुंबई : सध्या कडक उन्हाळा (Summer) सुरू आहे. अश्यात थंडाव्यासाठी आईस्क्रीम (ice cream) खाल्लं जातंय. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खाल्ले असतील. रोल आईस्क्रीमची तर मजाच न्यारी. पण सध्या एक वेगळंच आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे आईस्क्रीम आहे दारूचं होय, दारूचं… याआधी हिरव्या मिर्चीचं आईस्क्रीम सोशल मीडियावर चर्चेत होतं. त्यानंतर इडलीचं आईस्क्रीम आलं… आता तर चक्कस दारूचं आईस्क्रीम बाजारात आलं आहे.
दारूपासून तयार करण्यात आलेलं रोल आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. Tanish Sharma या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हे उत्तम चवीचं आहे, असं याला कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हीडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तीन लाखांहून अधिक लोकांनी याला लाईल केलंय.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे. कारणही तसंच खास आहे. हा व्हीडिओ आहे आईस्क्रिमचा हे आईस्क्रिम सध्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनलं आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती हिरव्या मिरचीचे आईस्क्रीम बनवत आहे. ती व्यक्ती प्रथम ट्रेवर चार मिरच्या ठेवते आणि त्यावर चॉकलेट सिरप टाकते. मग ती व्यक्ती पुन्हा चॉकलेट सिरप आणि क्रीम टाकून मिरची बारीक कापून पातळ पेस्ट बनवते. थंड झाल्यावर रोल बनवून मिरचीसह सर्व्ह करते. व्हीडिओमध्ये काही महिला हे चिली आईस्क्रीम खाताना दिसत आहेत.
उन्हाळाच्या दिवसात लोक शक्कल लढवून विविध पेय, आईस्क्रीम तयार करत असतात. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आईस्क्रीमवर केले जाणारे प्रयोग… सध्या असंच इडलीचं आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इडली, सांबर आणि चटणीपासून बनवलेलं हे आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.