प्रेमासाठी सात समुद्र ओलांडून प्रियकर किंवा प्रेयसीला भेटण्याचा जमाना आता झाला. आता अंतराळात प्रेम, रोमान्स आणि सेक्सची संधीही उपलब्ध झाली आहे. ही कथा सायफाय सिनेमाची नाही तर वास्तव आहे. जर तुम्हालाही आपल्या जोडीदारासोबत अंतराळात नातं निर्माण करायचं असेल तर नासाच्या या प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नासाचा दावा आहे की, अद्याप कोणत्याही मानवाने अंतराळात रोमान्स केलेला नाही. पण आता ते शक्य होणार आहे. नासाने रोमान्ससाठी या नव्या जगाची तयारी पूर्ण केली आहे. नासाने या प्रकल्पाला 68 माइल हाय क्लब असे नाव दिले आहे.
या क्लबमध्ये सामील झाल्याने तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत अंतराळात रोमान्स करू शकाल, त्यासाठी बुकिंग सुरू झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाची सर्व तयारी या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल.
लोक लवकरच अंतराळात रोमान्ससाठी बुकिंग करू शकतील. नासाचे अंतराळवीर जोस हर्नांडेझ यांनी स्पेस रोमान्स प्रोजेक्टची संपूर्ण माहिती दिली आहे. यंदा व्यावसायिक उड्डाणांना हिरवा कंदील मिळताच प्रेमात काहीतरी नवं करू इच्छिणारी माणसे अंतराळ पर्यटक बनून रोमान्सचा नवा विक्रम रचतील, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, अंतराळात रोमान्स करणे किंवा सेक्स करणे अजिबात बेकायदेशीर ठरणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पेस टूरची किंमत काय असेल, एका प्रवाशाचे भाडे 3 कोटी 75 लाख रुपये असेल, असे जोस यांनी सांगितले. म्हणजेच तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील स्पेस रोमान्सची किंमत 3 कोटींपेक्षा जास्त असेल.