Luna 25 Crashed | चांद्रयान घेणार लूना-25 चा बदला! चंद्रावर उतरून निभावणार मैत्री! ट्विटरवर मिम्सचा पाऊस

| Updated on: Aug 20, 2023 | 9:43 PM

रशियाला आता इतक्या लवकर चंद्रावर मोहिमेची तयारी करता येणार नाही. या अपघातामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची बातमी भारतातील लोकांपर्यंत पोहोचताच ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

Luna 25 Crashed | चांद्रयान घेणार लूना-25 चा बदला! चंद्रावर उतरून निभावणार मैत्री! ट्विटरवर मिम्सचा पाऊस
luna 25 russia
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: कोणतेही काम कोणत्याही तयारीशिवाय कोणालाही न बघता करू नये, असे सांगितले जाते. लूना-25  च्या बाबतीत हे अगदी खरे आहे. रशियाने ही 11 ऑगस्ट रोजी आपले लूना-25 प्रक्षेपित केले होते. जगाच्या दृष्टीने ही लूना-25 चांद्रयानापेक्षा कितीतरी पटीने प्रगत होते आणि ही रशियन चंद्र मोहीम भारताच्या चांद्रयानापेक्षा अधिक यशस्वी ठरेल, असे शास्त्रज्ञांना वाटत होते, परंतु रशियाची ही मोहीम लँडिंगपूर्वीच अंतराळात कोसळली.

रशियाचे लूना-25 हे अंतराळयान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्था रोस्कोस्मोसने दिली आहे. मात्र, अपघातापूर्वी त्यांनी चंद्राची दूरवरची छायाचित्रे काढली होती. त्यांच्या चुकीच्या मापदंडांमुळे आणि चुकीच्या डेटा विश्लेषणामुळे ही घटना घडल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. मात्र, रशियाला आता इतक्या लवकर चंद्रावर मोहिमेची तयारी करता येणार नाही. या अपघातामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची बातमी भारतातील लोकांपर्यंत पोहोचताच ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.