नवी दिल्ली : पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडा येथील सचिन मीणाच्या लव्ह स्टोरीमध्ये मिथिलेश भाटी चर्चेत आहे. मिथिलेश भाटी तीच महिला आहे, जिने सचिनला लप्पू आणि झींगूर म्हणाली होती. तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच हे वक्तव्य बॉडी शेमिंगशी जोडलं गेलं. आता याच प्रकरणात अनेक संघटना मिथिलेशच्या समर्थनात समोर आल्या आहेत. हिंदू संघटना पुन्हा सीमाला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करत आहेत.
पाठिंबा देण्याच्या या प्रकरणात दिल्ली हायकोर्ट आणि गौतम बुद्धनगर जिल्हा कोर्टातील 10 वकिलांची टीम रबूपुरा येथे पोहोचली आहे. मिथिलेशला कोणी नोटिस पाठवली, तर तिची आम्ही फ्री मध्ये केस लढू असं या वकिलांनी सांगितलं.
मिथिलेशला कोणाच समर्थन?
मिथिलेशच वक्तव्य मानहानीच्या कक्षेत येत नाही. वकिलांसोबतच हिंदू संघटना, शेतकरी संघटना आणि युवा वर्ग तिचं समर्थन करतोय. झींगूर आणि लप्पूवाल वक्तव्य ग्रामीण भाषेत नॉर्मल आहे, अशं मिथिलेशच्या समर्थकांच म्हणणं आहे.
मिथिलेशसाठी सुद्धा कोणीना कोणी असेल
आतापर्यंत गीता भाटी आणि मिथलेश भाटीला कुठलीही नोटीस आलेली नाही. गीता भाटी मिथिलेशच्या वक्तव्याच समर्थन करते. मिथिलेश गावची महिला आहे. ती सचिनबाबत असं जाणूनबुजून बोलली नाहीय. सचिनला बोललेल्या शब्दांवरुन वाद निर्माण झालाय. त्याच्यासाठी वकिल असेल, तर मिथिलेशसाठी सुद्धा कोणीना कोणी असेल.
काळ्या-पाण्याची शिक्षा देतील, अजून काय?
‘लप्पू सा सचिन, झिंगुर सा लड़का’ बोलणाऱ्या मिथिलेश भाटीला लीगल नोटीस पाठवण्याची तयारी सुरु आहे. तिने सचिनबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत. मिथिलेशला लीगल नोटीसबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाला की, “नोटीस येईल तेव्हा पाहू. काय करायचं?. फासावर लटकवतील, तुरुंगात पाठवतील, काळ्या-पाण्याची शिक्षा देतील. त्यापेक्षा जास्त काही असू शकत नाही”