मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) नुकतेच 50 व्या वर्षात पदार्पण केलं. जगभरातील लोकप्रिय खेळाडून आणि पर्सनॅलिटी असूनही सचिनने आपल्या वाढदिवसाचं कोणतंही मोठं सेलिब्रेशन केलं नाही. पैशाची उधळपट्टी केली नाही अन् बडेजावही मिरवला नाही. नेहमी जमिनीवर असणारा सचिन तेंडुलकर वयाच्या पन्नाशीतही तितकाच जमिनीवर असून मातीशी जोडलेला आहे. सचिनने एका गावात जाऊन वाढदिवस साजरा केला. सोबत फक्त पत्नी अंजली (anjali tendulkar) आणि मुलगी सारा (sara tendulkar) होती. यावेळी या तिघा मायलेकरांनी चक्क चुलीवर स्वयंपाक केला. सचिनने तर हाती फुंकणी घेऊन चूल पेटवली. सचिनचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. सचिनने ट्विट केलेल्या या फोटोवर गंमतीदार प्रतिक्रियाही उमटत आहे.
या फोटोत सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि कन्या सारा दिसत आहे. हे तिघेही एका मातीच्या घराच्या बाहेर आहेत. या घराच्या बाहेर दोन जोडलेल्या चुली आहेत. दोन्ही चुलीवर मडके ठेवलेले आहे. सचिन एक चूल फुंकणीने फुंकत आहे. सचिनचं संपूर्ण लक्ष चुलीकडे आहे. तर सारा उभी असून मडक्यात काही तरी ढवळताना दिसत आहे. अंजली या सुद्धा सचिनच्या बाजूलाच बसल्या आहेत. अंजली आणि सारा दोघीही कॅमेऱ्याकडे बघत आहेत. म्हणजेच फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. तर सचिन मात्र, आपल्या कामात व्यस्त असल्याचं दिसत आहे.
सचिनचे जगभरात चाहते आहेत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा मोठा वर्ग आहे. हा फोटो पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही मराठीत आहेत. काही इंग्रजी आणि काही हिंदीत आहेत. काही प्रतिक्रिया तर चक्क बंगालीतही आहेत. डोळ्यात धूर गेल्यानंतर आमटी/ भाजी अजून जास्त चवदार लागते, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. हा नेटकरी पेशानं डॉक्टर आहे.
It’s not every day that you hit a half-century, but when you do, it’s worth celebrating with the ones who matter the most. Recently celebrated a special 50 in a quiet serene village with my team – my family! ❤️
PS: Missed Arjun a lot as he is busy with the IPL. pic.twitter.com/KjIrRvciOu
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 5, 2023
सर, क्या पका रहे है खिचडी? असं एकानं म्हटलं आहे. दुसऱ्याने तर गावाकडची मज्जा वेगळीच असते ना… असं म्हटलं आहे. सर, जाळ आणि धूर काढायची सवय अजून गेली नाही तुमची, अशी मिश्किल प्रतिक्रिया एकाने दिली आहे. सर्वांनीच सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सचिनला जंतरमंतरवर पैलवानाच्या आंदोलनाकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
सचिनने हा फोटो शेअर करून त्यावर कमेंट केली आहे. असं नाही की तुम्ही प्रत्येक दिवशी अर्धशतक लगावता. पण जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही लोकांसोबत सेलिब्रेशन करण्यास पात्र ठरता. ते सर्वात महत्त्वाचं असतं. नुकताच मी माझा 50 वा वाढदिवस एका शांत आणि निसर्गरम्य गावात साजरा केला. त्यावेळी माझ्यासोबत माझी टीम (कुटुंब) होतं. या खास क्षणी मी अर्जुनला मिस करतोय. अर्जुन सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे, असं सचिनने म्हटलं आहे.