मुंबई : सध्या बॉडी फिटनसेचा एक नवा ट्रेंड आलाय. चांगलं दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी सिक्स पॅक अॅप्सची बॉडी बनवायची, अशी तरुणांची इच्छा असते. त्यामुळे ते दिवसातील दोन ते तीन तास जीममध्ये दररोज वर्कआऊट करतात. आता तर या ट्रेंडची भुरड क्रिकेट जगतातील सर्वात मोठा खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही पडली आहे. यामागील कारण इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस ट्रिमलेट हा आहे. ख्रिस ट्रिमलेटचं वय 39 वर्ष आहे. पण त्याची बॉडी ही पंचविशीतल्या तरुणासारखी भासते. इतकं भारी त्याने स्वत:ला मेटेंन केलं आहे. त्याची बॉडी बघून सचिन तेंडुलकरलाही तशा बॉडीची भुरड पडलीय (Sachin Tendulkar want to make body like england player Chris Tremlett).
रायपूरमध्ये सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचं आयोजन करण्यात आलं आहे. या सीरीजमध्ये ख्रिल ट्रिमलेट हा इंग्लंड लिजेंड्स संघाकडून खेळत आहेत. सचिन सध्या ट्रिमलेटचा ट्रेनिंग पार्टनर आहे. दोघं सध्या रायपूरच्या ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तिथे ते एकत्र जिममध्ये व्यायम करतात. ख्रिसने दोघांचा जिममधील फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केलाय. या फोटोसोबत ‘माझा सर्वकालीन हिरो आणि नवा ट्रेनिंग पार्टनर’, असं कॅप्शन ख्रिसने दिलंय (Sachin Tendulkar want to make body like england player Chris Tremlett)
.
सचिनचं मजेशीर ट्विट
सचिनने जिममध्ये जेव्हा ख्रिसची बॉडी बघितली तेव्हा तो जागेवरच थक्क होऊन गेला. सचिनलाही आता ख्रिससारखी बॉडी बनवायची आहे. दरम्यान, ख्रिसच्या ट्विटला सचिनने मजेशीर उत्तर दिलं. जर ख्रिससारखी बॉडी बनवायची असेल तर किती ऑम्लेट खावे लागतील? असा मजेशीर प्रश्न सचिनने ट्विटरवर विचारला आहे.
How many OMELETTES would I need to eat to look like TREMLETT? ? ?
मुझे TREMLETT जैसे बनने के लिए कितने OMELETTE ? खाने पड़ेंगे?? ? https://t.co/jGa4mCgA8L
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 10, 2021
सामन्यात इंग्लंड लिजेंड्सची इंडिया लिजेंड्सवर मात
दरम्यान, इंडिया आणि इंग्लंड लिजेंड्समध्ये यांच्यातील गेल्या सामन्यात इंग्लंडच्या लिजेंड्सने बाजी मारली होती. दोघी संघांनी चांगल्या धावा केल्या होत्या. मात्र, सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वातील संघ शेवटच्यावेळी थोडा कमी पडला. त्यामुळे सामना हातातून निसटला होता.