सद्दाम हुसेन, असं नाव जे सहसा तुमच्या मनात हुकूमशहाची प्रतिमा निर्माण करतं. एक हुकूमशहा जो क्रूर होता. त्याच्या क्रौर्याशी संबंधित अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील. पण तो केवळ क्रूर होता असं नाही, तर काही लोक त्याला मसीहा सुद्धा मानत असत. धर्मावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती, असे म्हटले जाते. त्यांना आलिशान मशिदी बांधण्याची खूप आवड होती. इराकमधील सद्दाम हुसेन यांनी बांधलेली मशीद खूप खास आहे. या मशिदीतील कुराण सद्दाम हुसेन यांच्या रक्ताने लिहिले गेले आहे.
सद्दाम हुसेन यांनी त्यांच्या कार्यकाळात कुराण शाईऐवजी रक्ताने लिहिण्यात यावे असे आदेश दिले. त्यासाठी सद्दाम हुसेन यांनी तीन वर्षांत त्यांचे 26 लिटर रक्त काढून घेतले.
दर आठवड्याला एक नर्स सद्दामच्या शरीरातून रक्त घेत असे. त्याचवेळी दुसरी टीम या रक्ताने कुराण लिहीत असे. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सद्दाम हुसेन यांच्या रक्ताने 605 पानी हे कुराण लिहिता आले. हे कुराण अजूनही लोकांना दाखवण्यासाठी काचेच्या फ्रेममध्ये तिथे ठेवलेलं आहे.
रक्तात लिहिलेल्या कुराणाबद्दल वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठातील सेंटर फॉर कंटेम्पररी अरब स्टडीजचे संचालक जोसेफ ससून सांगतात की, एका मोठ्या कार्यक्रमात सद्दामला हे कुराण सादर करण्यात आलं. तेव्हा सद्दामने सांगितले होते की, त्याने आपल्या रक्ताने हे कुराण लिहून भेट केलंय.
त्याचबरोबर काही लोकांची समजूत होती की त्याचा मुलगा १९९६ च्या युद्धात वाचला, त्याने देवाचे आभार मानण्यासाठी रक्ताने कुराण लिहिले.
निडर समजल्या जाणाऱ्या, हजारोंचा बळी घेणाऱ्या सद्दाम हुसेन या हुकूमशहाची अखेरच्या काळात अत्यंत वाईट परिस्थिती होती.
त्याला नेहमी भीती वाटायची की, कोणीतरी आपल्याला ठार मारेल. सद्दामला दिले जाणारे जेवण सद्दाम खाण्याआधी त्याच्या स्वयंपाक्याचा मुलगा ते खायचा.