निवडणुकीच्या वेळी नेते आश्वासनांचा पाऊस पाडतात. आश्वासनांवर आश्वासने… इतकी आश्वासने देतात की, सामान्य माणसालाही प्रश्न पडतो. आश्वासनांचं नंतर काहीही होऊ पण तो व्यक्ती मात्र निवडणूक नक्की जिंकतो.
बाकी काहीही होऊ पण निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार मात्र नक्कीच चर्चेत असतात. असेच एक जनाब आहेत. ज्यांच्या आश्वासनांमुळे ते प्रचंड चर्चेत आलेत. त्यांनी आश्वासनांची यादी टाकलीय. हीच यादी एका आयपीएस अधिकाऱ्याने पोस्ट केली आणि लिहिलं, “मला या गावात जायचंय”
जेव्हा एका आयपीएसने ही यादी पाहिली, तेव्हा त्यांनी मजेत पोस्टरचा फोटो शेअर केला आणि लिहिले – मी या गावात स्थायिक होणार आहे!
यावर सर्वसामान्यांपासून आयपीएस, आयएएस आदींपर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
या अनोख्या पोस्टरचा फोटो भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी @arunbothra यांनी 9 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर शेअर केला होता.
त्यांनी कॅप्शनमध्ये मजेशीर इमोजीसह लिहिले – “मी या गावात शिफ्ट होणार आहे.” या ट्विटला सुमारे 8 हजार लाईक्स आणि 1 हजाराहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.
Am shifting to this village ? pic.twitter.com/fsfrjxbdLc
— Arun Bothra ?? (@arunbothra) October 9, 2022
या यादीच्या माध्यमातून उमेदवाराने गावात तीन विमानतळ बांधणे, महिलांसाठी मोफत वायफाय आणि मोफत मेकअप किट्स अशी एकूण 13 आश्वासने दिली आहेत. ही आश्वासनं प्रचंड चर्चेत आहेत.