सांगली : पलूस (Palus) येथे नवरदेवाने (Groom) आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करत असताना मंगलाष्टकाच्या अगोदर सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवगर्जना (Shivgarjana) म्हणून सर्वांच्या अंगावर शहारे आणले. पलूस येथील संग्राम हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. ओंकार निवास पाटील आणि प्रियंका रघुनाथ मोरे यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ओंकारने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली. लग्नसराईचा काळ असल्याने सर्वत्र आपल्याला विवाहसोहळ्याची धामधूम दिसून येतेय. घरात लगीनघाई असल्याने प्रत्येकजण त्या कामात असतो. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असल्याने ती संस्मरणीय व्हावी असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.
वातावरणात उत्साह
पलूस येथील नवरदेवाने आपला विवाहसोहळा कायम स्मरणात राहावा, यासाठी हा हटके असा प्रयत्न केला. लग्नानंतरच्या आयुष्याची एक सकारात्मक सुरुवात करण्याच्या हेतूने नवरदेव ओंकार निवास पाटील याने आपल्या विवाह सोहळ्यात शीवगर्जना म्हणत वातावरण उत्साहमय करून टाकले. अत्यंत भारदस्त अशा आवाजात जोश निर्माण होईल, अशा स्वरात त्याने शीवगर्जना म्हटली.
सर्वत्र लग्नाची चर्चा
जवळपास एक मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. शीवगर्जना झाल्यानंतर माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. तर शेवटी हर हर महादेव म्हणत शीवगर्जना पूर्ण केली. आता या अनोख्या लग्नसोहळ्याची आणि शीवगर्जनेची चर्चा सर्वत्र होतेय. हा व्हिडिओही व्हायरल होतोय.
संस्मरणीय लग्नसोहळा : पहाडी आवाजात शिवगर्जना म्हणत नवरदेवानं लग्नमंडपात संचारला उत्साह, Video Viral#groom #wedding #marriage #sangli #Maharashtra #ViralVideo #Viral #Trending #socialmedia
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा – https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/h8nFkp9ysv— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2022
आणखी वाचा :