लहान मुलांमध्ये टॅलेंटची कमी नसते. आता सोशल मीडियामुळे या टॅलेंटला एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळालंय. जरा काही चांगलं असलं तर ते व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आता तुम्हीच सांगा नोरा फतेहीचे किती फॅन्स आहेत. या सगळ्या फॅन्सला वाटतं नोरा शिवाय किंवा नोरा सारखं जबरदस्त डान्स कुणीच करू शकत नाही. पण हा व्हिडीओ जेव्हा तुम्ही बघाल तुमचे फ्युज उडतील. कारण हा छोटासा मुलगा इतका खतरनाक डान्स करतोय की त्यासमोर नोरा च काय कुणीही फिकं पडेल. अगदी आपल्या गौतमी पाटलाचा सुद्धा निभाव लागणार नाही. हा व्हिडीओ नक्की पहा, कमाल व्हिडीओ आहे हा.
जेव्हा हा मुलगा नाचायला लागतो त्याचे वर्गमित्र तुफान गोंधळ घालतात, त्याला प्रोत्साहन देतात. त्या गाण्याचा सुद्धा आवाज कमी वाटू लागतो. का नाही ओरडणार? इतका भन्नाट डान्स कधी कुणी पहिलाच नसेल.
यामध्ये मुलगा शाळेच्या ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या ‘हाय गर्मी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स इतक्या जोरात आहेत की, गाण्यापेक्षा प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज अधिक येतोय. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
होय, जो कुणी या मुलाचा डान्स बघेल तो त्याचा फॅन होईल. ही क्लिप एका इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आली आहे, ज्याला आतापर्यंत 56 लाख व्ह्यूज आणि 7 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
यावर हजारो युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की छोटूने नोरा फतेहीला मागे टाकले, तर काहींनी असे लिहिले की त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली.