शाळेत सुरक्षित पोहचण्यासाठी आणि शाळेतून सुरक्षित घरी परत येण्यासाठी पालक मुलांना स्कूल बस लावून देतात. नाही का? हे एकमेव कारण नसलं तरी अनेक कारणांपैकी एक आणि सगळ्यात मोठं कारण आहे. पालक व्यस्त, रस्त्यावरची रहदारी, लांब असणाऱ्या शाळा या सगळ्यात मुलांकडे लक्ष कसं ठेवणार त्यामुळे खरं तर हे स्कूल बस कल्चर आलं. पण याच स्कूल बस घातक सुद्धा असतात बरं का. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एक मुलगी स्कूल बस मधून उतरताना स्कूल बसच्या दारात अडकली. बस ड्राइव्हरच्या हे लक्षात आलं नाही. पुढे काय झालं बघा…
HOLY SHIT.
The little girl is miraculously fine, the bus driver has been fired. pic.twitter.com/uuijsrNn2U— Dean Blundell?? (@ItsDeanBlundell) September 23, 2022
स्कूल बस थांबण्यापूर्वी एका लहान मुलीला शाळेच्या बसने 1,000 फुटांपेक्षा जास्त फरफटत नेल्याचा भीषण व्हिडिओ ऑनलाईन समोर आलाय. ही क्लिप डीन ब्लंडेल या युजरने ट्विटरवर शेअर केलीये.
ही लहान मुलगी स्कूलबसमधून उतरताना दिसली तेव्हा तिची बॅग दरवाजात अडकली. बसचालकाला हे ती अडकलीय हे लक्षात आलं नाही. त्याने बसचा वेग वाढविला.
लक्ष न गेल्यामुळे गाडीचा वेग अर्थातच वाढत गेला. चालक भरधाव वेगाने गाडी चालवत राहिला. मुलगी फरफटत राहिली. हा सर्व प्रकार आतमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलगी बसमधून कशी उतरली आणि गेट बंद करताना चालकाचं लक्षच गेलं नाही, हे दिसून येतंय. स्कूलबसचे गेट बंद होत असताना मुलीची बॅग गेटमध्ये अडकली. बसचालक आणि मागे उभ्या असलेल्या व्यक्तीलाही हा प्रकार लक्षात आला नाही.
कार भरधाव वेगाने धावली आणि मुलगी गेटला लटकली. बराच पुढे गेल्यावर चालकाची नजर दरवाज्यात लटकलेल्या मुलीवर गेली. त्याने ताबडतोब गाडी थांबवली आणि गेट उघडून तो त्या मुलीकडे धावला.
या फुटेजमुळे इंटरनेट युजर्सना आश्चर्याचा धक्का बसलाय. काहींनी या क्लिपला भयंकर म्हटले तर काहींनी ड्रायव्हरच्या लक्षात यायला इतका वेळ कसा लागला, असा प्रश्न विचारला.