मुंबई: मुलं म्हणजे देवाघरची फुलं! लहान मुले खूप निरागस असतात. लहानपणी जे त्यांना शिकवलं जातं ही मुले तेच करतात म्हणून असं म्हटलं जातं की संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. आता सोशल मीडियामुळे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी यात लहान मुलं डान्स करत असतात, कधी गाणं म्हणत असतात, कधी काय तर कधी काय. आता ही मुलं इतकी कलाकार झालीयेत की त्यांना सोशल मीडियासारखा चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा मिळालाय. रोज असे लाखो व्हिडीओ व्हायरल होतात, प्लॅटफॉर्म पण तर तितकेच आहेत. असाच एक हटके व्हिडीओ व्हायरल होतोय जो बघून तुम्ही म्हणाल, “वाह! याला म्हणतात संस्कार!”
आपण जाता-येता रस्त्यावर भिकारी बघतो. रस्त्यावर, ट्रेनमध्ये, फुटपाथवर या भिकाऱ्यांची अवस्था वाईट असते. यांना जितके पैसे, जितकं खायला देऊ तितकं कमीच असतं. अनेक लोकं थांबून या भिकाऱ्यांना मदत करतात. काहींचं तर असं म्हणणं असतं की यांनी भीक मागण्याऐवजी काहीतरी काम करावं. पण आपल्यापैकी किती लोकं घरातील लहान मुलांना “तुमचा डब्बा गरजवंतांना द्या, एखाद्या भिकाऱ्याला द्या” असं सांगतो? हा व्हिडीओ बघा.
या व्हिडीओमध्ये एक भिकारी रस्त्यावर भीक मागतोय. त्याला बघून तुम्हालाही दया येईल. तेवढ्यात तिथे एक मुलगी येते. या मुलीने शाळेचा गणवेश घातलाय. ती त्या भिकाऱ्याजवळ जाते आणि आपला शाळेचा डब्बा उघडते. या डब्यातील अन्न ती त्या भिकाऱ्याला देते. भिकारी सुद्धा तो ते अन्न घेतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. लोक म्हणतायत, “या मुलीवर संस्कार चांगले आहेत.” ही मुलगी नुसतं त्या भिकाऱ्याला खायला देत नाही तर तो अंध असल्याने त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालते. हा व्हिडीओ भावुक करणारा आहे.