थाई एअरवेजच्या बँकॉक-इंडिया विमानात झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ट्विटरसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन पुरुष प्रवासी जोरदार भांडताना दिसत आहेत. हे भांडण शेवटी इतकं वाढत जातं की त्याचं रूपांतर शेवटी हाणामारीमध्ये होतं. या सगळ्यात इतर प्रवासी हा सगळं तमाशा बघत बसलेले असतात. तर फ्लाइट अटेंडंट असहाय्यपणे पाहत असतात.
या व्हिडिओमध्ये आधी दोन प्रवासी एकमेकांवर आरडाओरड करताना दिसतात. व्हिडीओ बघताना असं वाटतं की हे कदाचित विमानातील बसण्याचा जागेवरून भांडत असावेत. भांडण नियंत्रणाबाहेर जातं आणि चांगलीच मारामारी होते.
आपण बघू शकतो, व्हिडिओत एकजण म्हणाला, शांत बसा तर दुसरा हात खाली करा असे म्हणतो आणि मग काही सेकंदातच या शाब्दिक भांडणाचे शारीरिक भांडणात रुपांतर होते आणि दुसऱ्याने आक्रमकपणे दुस-याला कानशिलात लगावली. या मारहाणीत अन्य काही प्रवाशांचाही सहभाग होता. थाई स्माइल एअरवेजने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Not many smiles on this @ThaiSmileAirway flight at all !
On a serious note, an aircraft is possibly the worst place ever to get into an altercation with someone.
Hope these nincompoops were arrested on arrival and dealt with by the authorities.#AvGeek pic.twitter.com/XCglmjtc9l— VT-VLO (@Vinamralongani) December 28, 2022
नागरी उड्डाण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने या घटनेची माहिती असून तपास करत असल्याचे म्हटले आहे.
“आम्ही व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे, ज्यात कोलकाताला जाणाऱ्या थाई एअरवेजच्या विमानात प्रवाशांमध्ये भांडण झालेलं दिसून येतंय. संबंधित प्राधिकरणाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे,” असे बीसीएएसचे महासंचालक झुल्फिक्वार हसन यांनी सांगितले.