मुंबई: रेशीम कसे बनवले जाते हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर सध्या सोशल मीडियावर रेशीम बनवण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेशीम किडीपासून रेशीम तयार करण्याची प्रक्रिया जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि वाचकांना नक्कीच माहिती असेल. पण तुम्ही कधी स्वतःच्या डोळ्यांनी रेशीम बनवताना पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी…या व्हिडिओमध्ये रेशीम किड्यांपासून सिल्क कापड कसं बनवलं जातं याची प्रोसेस दाखविण्यात आलीये. व्हिडीओ पूर्ण पहा, अतिशय रंजक असा हा व्हिडीओ आहे.
रेशीम कसे तयार केले जाते याचा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रेशीम बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे पाहता येईल. प्रथम कारागिरांनी रेशीम किडे गोलाकार लाकडी रचनेत ठेवले. मग ते सरळ उभे केले आणि ते तसेच ठेवले. अल्पावधीतच रेशीम किडे नैसर्गिकरित्या स्वत:वर ‘प्युपा’ किंवा ‘कोष’ तयार करतात. हे कोष गरम पाण्याने धुवून अत्यंत काळजीपूर्वक यंत्रावर एक-एक करून लावले जातात. शेवटी सर्व कोष एकत्र येऊन एक धागा तयार होतो.
आपण नेहमीच ऐकतो की, सुख मिळवण्यासाठी आपण ते सुख इतरांना देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. रेशीम किड्यांपासून ही महत्त्वाची गोष्ट शिकता येते. प्रत्यक्षात रेशीम किडीचे वय केवळ 2 ते 3 दिवस मानले जाते. दररोज 200 ते 300 अंडी देण्याची त्याची क्षमता आहे. अंड्यातून 10 दिवसांत अळ्या बाहेर पडतात. अळ्या त्यांच्या तोंडातून द्रव प्रथिने स्रावित करतात. हवेच्या संपर्कात येताच ते कडक होऊन धाग्याचे रूप धारण करते, ज्याला ‘कोष’ म्हणतात. यापासूनच सिल्क बनवलं जातं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.