प्रवासाच्या वेळी गाड्या कधीकधी इतक्या उशिरा येतात की माणूस वौतागून जातो. रेल्वेगाड्याही बरेचदा उशिरा येतात तासंतास लोक प्लॅटफॉर्मवर वाट बघत असतात. मग एकदाची गाडी आली की त्यांना असा काही आनंद होतो की बास. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तब्बल 9 तासांच्या विलंबानंतर ट्रेन स्टेशनवर पोहोचल्यावर प्रवासी इतके खुश होतात की तो आनंद ते साजरा करतात.
व्हायरल क्लिपमध्ये लोक नाचताना आणि ट्रेनच्या आगमनाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. ट्विटरवर हार्दिक बोंथू नावाच्या युझरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आमची ट्रेन 9 तास उशिराने आहे. जेव्हा ट्रेन आली तेव्हा लोकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.”
ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच लोकांनी आनंदाने उड्या मारल्या. व्हायरल क्लिपमध्ये प्लॅटफॉर्म प्रवाशांनी खचाखच भरलेला दिसत आहे. मग ट्रेन हॉर्न वाजवत प्लॅटफॉर्मवर येते. हे पाहून तिथे उपस्थित असलेले अनेक प्रवासी आनंदाने नाचू लागतात, आनंद साजरा करू लागतात.
व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्मवर उभे असलेले शेकडो प्रवासी थोड्या अंतरावरून येणारी ट्रेन उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत. त्यांच्याजवळ गाडी थांबताच लोक टाळ्या वाजवून नाचू लागतात. एक व्यक्ती तर अक्षरशः ट्रेनसमोर नतमस्तक होते आणि ट्रेनचे आभार मानते.
Our train got late by 9 hours. This is how people reacted when it arrived. pic.twitter.com/8jteVaA3iX
— Hardik Bonthu (@bonthu_hardik) November 27, 2022
आता हा व्हिडिओ पाहून ट्विटर युजर्सने भरपूर कमेंट्स केल्या आहेत. 9 तास उशिराने धावणारी ही कोणती ट्रेन आहे, असा सवालही काहींनी केला आहे.
एका युझरने लिहिले, टीडीआर फाइल करा आणि रिफंड घ्या. आणखी एका युझरने लिहिले की, ‘देशात आता हे सामान्य झाले आहे.