मुंबई: मला सत्तेचा मोह नाही, आमदारांना मी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून नको असेन तर समोर येऊन सांगावं मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे असं भावुक भाषण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांनी केलं. काल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं,रात्री साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा निवासस्थान सोडले. ते वर्षावरुन निघताना त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी (Shivsainik) मोठी गर्दी केली होती. त्यांना वर्षा निवासस्थानातून निघताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. वर्षातून निघण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार त्यांना भेटण्यासाठी पोहचले होते. शिवसैनिकांनी इंटरनेटवर सुद्धा बऱ्याच गोष्टी शेअर केल्यात. आता इंटरनेट आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग असेल तर तो डावलून चालेल कसा, बघुयात काय काय शेअर केलंय शिवसैनिकांनी इंटरनेटवर…
मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शासकीय निवासस्थान सोडलं तेव्हा जनतेची भावना काय असेल हे सांगणारी एक पोस्ट! या पोस्ट मध्ये बाहुबली चित्रपटाचं एक दृश्य दाखवण्यात आलंय.
When uddhav Thackeray leaves varsha bunglow and shifts to matoshree!
Le shivsainik: #Shivsena pic.twitter.com/vWYKB6kAtr
— Mumbaicha_engineer (@berozgaarhoo) June 22, 2022
काहींनी उद्धव ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा जुना फोटो शेअर केलाय. ही पोस्ट शेअर करताना यूजरने वर लिहिलंय की एक खरा शिवसैनिक हे नक्की बघेल…
The core shivsainik will see this pic.twitter.com/ivqKsdpEFS
— शिवसैनिक RICHARD (@Richard_mkm) June 22, 2022
My CM @uddhavthackeray
I support @ShivSena https://t.co/aLUsHWlXeE— Noorie Shaw (@NoorieShaw) June 22, 2022
गद्दारी करणारे शिवसैनिक नाहीत असं स्पष्टपणे सांगणारी एक पोस्ट. निष्ठा म्हणजेच शिवसेना असं कार्यकर्ते म्हणतायत…
जे कट्टर शिवसैनिक असतात ते कधीच गद्दारी करत नाही आणि जे गद्दारी करतात ते कधीच शिवसैनिक होऊ शकत नाही !#I_Support_Uddhav_Thakre@OfficeofUT@ShivSena@mybmc@mieknathshinde @ThaneKalyanDAB @rautsanjay61 @VasaiVirarMcorp @TMCaTweetAway @KDMCOfficial @Jalgaon @SwachhBuldhana pic.twitter.com/QdCDaiThnJ
— क्रांतिकारी संघर्ष (@k_sangharsa) June 22, 2022
(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)