सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात मात्र हा व्हिडिओ धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये आदिवासी लोक पहिल्यांदाच एका गोऱ्या व्यक्तीला भेटतात आणि त्याला पाहून त्यांना धक्का बसतो कारण त्यांनी यापूर्वी असं काही पाहिलं नव्हतं. आदिवासी आणि गोरे लोक पहिल्यांदाच भेटल्याचा हा व्हिडिओ 1993 सालचा असल्याचा दावा केला जात आहे. आदिवासींना जेव्हा गोरा माणूस पहिल्यांदा दिसतो, तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ज्यानंतर ते त्याला स्पर्श करतात आणि विचित्र प्रतिक्रिया देतात.
आदिवासी आणि गोऱ्या माणसांच्या पहिल्या भेटीचा व्हिडिओ हिस्टरी इन पिक्चर्स नावाच्या हँडलने ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” जंगलातील रहिवाशी 1993 मध्ये पहिल्यांदा एका गोऱ्या मनुष्याला भेटली”
Forest tribe meets a white man for the first time in 1993 pic.twitter.com/IkrROUBFJr
— History In Pictures (@HistoryInPics) December 9, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये आदिवासी लोक आळीपाळीने गोऱ्या माणसाला स्पर्श करताना दिसत आहेत. गोऱ्या माणसाला स्पर्श करताच ते आपला हात काढून घेतात, जणू काही त्यांना विजेचा धक्का बसला आहे.
आदिवासी लोक प्रथम गोऱ्या माणसाच्या तळहाताला स्पर्श करतात. यानंतर ते तिच्या हाता-पायाला स्पर्श करतात. हे काम ते घाबरत करतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओला ट्विटरवर आतापर्यंत 54 हजारांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.
याशिवाय 5,500 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका ट्विटर युझरने लिहिले की, “मी हा माहितीपट पाहिला आहे. हे अविश्वसनीय आहे. हे पहिल्यांदा एलियन्सला पाहिल्यासारखं आहे.”