आक्रमकता तीच! सिंह पिंजऱ्यात असो की जंगलात…भयानक व्हिडीओ

| Updated on: Jun 21, 2023 | 5:02 PM

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात माणसाने सिंहाची खोड काढली, कदाचित तो जंगलाचा राजा कोण आहे हे विसरला असावा. एक व्यक्ती पिंजऱ्यात बंदिस्त सिंहासोबत मस्ती करत होता आणि त्याला चिडवत होता.

आक्रमकता तीच! सिंह पिंजऱ्यात असो की जंगलात...भयानक व्हिडीओ
lion video
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: सिंह पिंजऱ्यात बंदिस्त असला तरी तो सिंहच असतो हे कधीही विसरू नये. मात्र, काही जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात माणसाने सिंहाची खोड काढली, कदाचित तो जंगलाचा राजा कोण आहे हे विसरला असावा. एक व्यक्ती पिंजऱ्यात बंदिस्त सिंहासोबत मस्ती करत होता आणि त्याला चिडवत होता. मग काय, सिंहाने त्याला असा डोस दिला की तो आयुष्यभर विसरणार नाही.

खरं तर तो माणूस सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा प्रयत्न करत होता. सिंह खूप चिडतो आणि त्याला दाखवून देतो. या व्हिडिओत तुम्ही सिंहाचा राग तुम्ही पाहू शकता. पण सिंह पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने तो काही करू शकला नाही. सिंहाने आपल्या धारदार दातांनी त्या व्यक्तीचे बोट पकडले, सिंह काय त्याला सोडायला तयार होत नव्हता.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माणूस कसा सिंहाच्या तोंडातून हात काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण सिंह तिथून जायला तयार नव्हता. मोठ्या कष्टाने त्या माणसाने त्याच्या तावडीतून आपला जीव वाचवला. सुदैवाने सिंहाने फक्त त्याचं बोट पकडलं होतं, नाहीतर तो समोर असता तर त्याने त्या माणसालाच फाडून खाल्लं असतं.

अवघ्या 25 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे की त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ लगेच मिळाले. अनेक लोकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात.