मुंबई: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडले की ते शेअर सुद्धा करतात. सोशल मीडिया हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा लोकं देखील वेळोवेळी फायदा घेत असतात. खूप प्रकारचे व्हिडीओ, कधी डान्सचे व्हिडीओ, कधी फॅशचे, कधी गाण्याचे असे खूप व्हिडीओ. लोकांना तर अक्षरशः रिल्स बघायची सवय लागलीये. लाखो लोक हे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून आज फेमस होतायत, खूप पैसे कमावतायत. आता हे डान्स, गाण्याचे व्हिडीओ एकीकडे आणि रेल्वे, मेट्रो, रेल्वे स्टेशन यावर बनवलेले व्हिडीओ एकीकडे. सोशल मीडियावर या रेल्वेच्या संदर्भातील व्हिडीओची एक वेगळी क्रेझ आहे. आपल्याला देखील असे हटके व्हिडीओ बघताना प्रश्न पडतो, “लोकं असं सुद्धा करू शकतात?”
हा व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये एक मुलगा रेल्वेच्या वरती चढलाय. या मुलाला अक्षरशः कसलीही भीती नाही. कसलाही विचार न करता हा मुलगा रेल्वेच्या वर चढतो, जणू काही हा स्पायडर मॅन आहे. आजवर आपण दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ पाहिलेत. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा नसून न्यूयॉर्क मधील आहे. हा व्हिडीओ बघून सगळ्यांना धक्का बसतोय. तुम्ही सुद्धा रेल्वेत डान्स करताना व्हिडीओ पाहिला असेल, गाणे म्हणताना व्हिडीओ पाहिला असेल पण कधीच रेल्वे वर चढून मजा मस्ती करतानाचा कुणाचा व्हिडीओ पाहिला नसेल.
व्हिडीओ मध्ये सुरुवातीला एक स्टेशनचा प्लॅटफॉर्म दिसतो. त्यावर प्रवासी रेल्वेची वाट बघतायत. जशी रेल्वे येते त्यावर माणूस उभा दिसतो. प्लॅटफॉर्मवर उभा असणाऱ्या सगळ्यांनाच त्या माणसाला बघून धक्का बसतो. तो माणूस रेल्वेवर उभा राहून स्पायडर मॅन सारखी पोझ सुद्धा देतो. त्याची जराशी चूक झाली असती तर खूप मोठा अपघात इथे दिसला असता. यावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्यात. एका व्हिडीओसाठी इतका मोठा स्टंट करणं कितपत योग्य आहे असा लोकांना प्रश्न पडतोय.