जेव्हा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल आणि तुमच्याकडे विमानाचा पर्याय असेल, तेव्हा तुम्ही लवकर पोहोचण्यासाठी त्याची निवड कराल. कारण आता विमान आणि रेल्वेच्या भाड्यात फारसा फरक राहिलेला नाही. विमानाने प्रवास करणे आरामदायी तसेच वेळेची बचत होते आणि थकवा ही येत नाही. समजा तुम्हाला सकाळी दिल्लीहून मुंबईला जायचं असेल आणि संध्याकाळी परत यायचं असेल तर तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. रेल्वेने हे करणे शक्य नाही.
न्यूयॉर्क ते सिंगापूर सारख्या लांब पल्ल्याच्या विमानांबद्दल आपण वाचले असेल की हे 16 तासांपेक्षा जास्त कालावधीचे उड्डाण आहे. आता जगातील सर्वात कमी पल्ल्याच्या उड्डाणाबद्दल बोलूया, हे विमान फक्त 53 सेकंदासाठी उड्डाण करते.
गंमत म्हणजे लोक या विमानाचा वापर करतात, म्हणजेच हे एक व्यावसायिक उड्डाण आहे. या विमानाने प्रवासी दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात.
एका मिनिटापेक्षा कमी कालावधीच्या या उड्डाणासाठी लोकांना सुमारे 14 पौंड खर्च करावे लागतात. भारतीय चलनात याबद्दल बोलायचे झाले तर ते 1815 रुपयांच्या आसपास येईल. मात्र स्कॉटलंडचा विचार करता हे भाडे खूपच कमी आहे.
खरं तर भाडे कपातीमागे सरकारचा हात आहे कारण इथे सरकार या विमानाच्या भाड्यात दोन बेटांवर राहणाऱ्या लोकांना सबसिडी देते, त्यामुळे इथे या लोकांना कमी भाडे द्यावे लागते. या दोन्ही बेटांची लोकसंख्या सुमारे 690 आहे.
वेस्ट्रो आणि पापा वेस्ट्रे अशी या बेटांची नावे आहेत. त्यांच्या लोकसंख्येबद्दल बोलायचे झाले तर वेस्ट्रेमध्ये 600 तर पापा वेस्ट्रे मध्ये 90 लोक राहतात.
या लोकांच्या प्रवासासाठी चालवल्या जाणाऱ्या विमानात एका वेळी फक्त 8 जण प्रवास करू शकतात. तुम्हालाही या कमी अंतराच्या उड्डाणाचा आनंद घ्यायचा असेल तर स्कॉटलंडला जावं लागेल.