मुंबई : शूर आम्ही सरदार आम्हाला (Shur Amhi Sardar Amhala), काय कुणाची भिती, हे गाणं कुणाला माहीत नाही, असं होणारच नाही. शांता शेळकेंचे बोल. त्यावर हृदयनाथ मंगेशकरांचा संगीत. हे कॉम्बिनेशकच खतरा होतं. मराठा तितुका मेळवावा, या सिनेमातील हे गाणं कधीच जुनं होणार नाही. होऊ शकत नाही! पण याच गाण्यानं आता पुन्हा एक कमाल केली आहे. जुनं तेच सोनं, असं म्हटलं जातं. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. याला कारण ठरलंय, समोर आलेला एका नवा व्हिडीओ! आम्ही मीमीकर फेसबुक पेजवरुन (Amhi memekar) हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कौतुकाच्या कमेन्ट्स केल्यात. या व्हिडीओवर लोकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय. याच एकानं म्हटलंय, की जे बॉलिवूडा जमलं नाही, ते टॉलिवूडनं (Bollywood vs Tollywood) करुन दाखवलं, असंही म्हणालेत. असं नेमकं म्हणण्यामागचं कारण काय आहे, हे समजून घेण्यासाठी तो व्हिडीओ नेमका काय आहे, हे पाहवं लागेल.
संकेत कदम नावाचा एक व्हिडीओ एडीटर आहे. या तरुणानं हा व्हिडीओ एडीट केलाय. आम्ही मीमकरवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून अनेकांना व्हिडीओ भावला आहे.
बाहुबलीनंतर एस राजामौली यांचा आरआरआर सिनेमा रोज नवा रेकॉर्ड करतोय. या सिनेमाच्या कमाईनं सगळ्यांना मागे टाकलंय. कोटींची उड्डाणं घेणारा या सिनेमाची चर्चाही तितकी जबरदस्त होतेय.
आरआरआर सिनेमातील शोले गाण्याच्या व्हिडीओवर संकेत कदमनं एडीट केलेलं गाणं तुफान गाजतंय. शोले गाण्याचा काही भाग एडीट करुन संकेत कदमनं त्यामागे शूर आम्ही सरदार आम्हाला हे गीत लावलंय. ज्युनियर एटीआर, राम चरण, आलीया भट आणि अजय देवगन यांच्या भूमिका असलेल्या आरआरआरच्या नाटू नाटू गाण्यापेक्षाही शोले गाणं सुरुवातीपासूनच गाजलं होतं.
आरआरआच्या गाण्यात एका फ्रेममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम दिसली होती. या फ्रेमचीही तुफान चर्चा झाली होती. फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे, तर वेगवेगळे महापुरुष या व्हिडीओत दिसले होते. यातूनच प्रेरणा घेऊन आता संकत कदमनं एडीट केलेल्या व्हिडीओ चर्चा झाली नसती, तरच नवल!
VIDEO : जिममध्ये खतरनाक स्टंट करतानाचा तरूणाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले वेडा आहे तो!
Video : परदेशी ‘गंगुबाई’, व्हीडिओ एकदा बघाच, बघताक्षणी डान्सरच्या प्रेमात पडाल… गॅरेंटी!