मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. कधीकधी काही व्हिडीओंना पाहून तर आपण थक्क होऊन जातो. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर लोकांना मोठ्या प्रमाणात आवडतात. अशा प्रकारचे मजेदार व्हिडीओ नेटकरी उत्स्फूर्तपणे शेअर करतात. तसेच अशा व्हिडीओंवर लोक भरभरून प्रतिक्रिया देतात. सध्या मात्र काहीसा वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये (Social Media) एका छोट्या मुलाजवळ भलामोठा साप देण्यात आलाय. हा साप जिवंत (Snake) असून त्याला घेऊन मुलगा मजेत हसत आहे. हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत. हा व्हिडीओ snake._.world या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसत आहे. या मुलाच्या हातात एक हिरवा साप आहे. सापासोबत व्हिडीओतील मुलगा खेळताना दिसतोय. तसेच तो आनंदात हसतदेखील आहे. एखाद्या प्राणिसंग्रहालयातील हा व्हिडीओ असावा असा अंदाज लावला जातोय. हा मुलगा खेळत असताना समोर कोणीतरी त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा सर्व प्रकार पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी मुलगा निरागसपणे खेळत असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी मुलाला सापासोबत खेळायला देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ :
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान मुलांना साप खेळायला देणे चुकीचे आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने साप चावू शकतो, असे म्हटलेय. साप विषारी नसला तरी लहान मुलांना खेळायला साप देत नसतात, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर काही लोकांनी मुलाच्या पालकांना दूषणे दिली आहेत.
इतर बातम्या :
अंतराळात सापडली रहस्यमय वस्तू; वैज्ञानिक म्हणतायत हे भयावह, आधी कधीही पाहिलं नाही!
Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा
वधूच्या प्रवेशापूर्वीच रडू येईल, वरानं आधीच केली होती भविष्यवाणी; काय घडलं पुढे? पाहा Viral Video