कुत्रा अशा अनेक गोष्टी करू शकतो ज्या गोष्टी गाढव, घोडे, बैल किंवा इतर प्राणी करूच शकत नाही. हेच कारण आहे की कुत्रा आणि माणूस यांच्यात फार जवळीक असते. असाच एक व्हिडिओ आजकाल लोकांमध्ये चर्चेत आहे, जिथे कुत्र्याच्या पराक्रमाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या कुत्र्याने स्वतःच स्वतःची समस्या सोडवलीये. कुत्र्याने डोकं लावून त्याच्या संघर्षावर मात केलीये. स्मार्ट कुत्रा!
आपण दररोज ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो. जेव्हा जेव्हा आपण त्यात अडकतो, तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, या समस्येपासून सुटका कशी मिळवायची?
एका कुत्र्याच्या आयुष्यात पण अशीच समस्या आली. तो कुठेतरी जात होता. त्यालाही अशाच ट्रॅफिक जॅमची समस्या आली. मग त्यानं काय केलं? डोकं लावलं.
Solving a traffic jam pic.twitter.com/hWksghdlj8
— Heckin Good Dogs (@HeckinGoodDogs) November 10, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये काही मेंढ्या एका गल्लीत रांगेत बसलेल्या दिसत आहेत, त्यामुळे संपूर्ण मार्ग बंद झालाय. येण्या-जाण्यासाठी जागा नाही. इतक्यात त्यांच्यावर पाळत ठेवणारा कुत्रा मेंढ्यांच्या वरून पटकन पळत जातो.
प्रत्येक मेंढीला पार करताना, प्रत्येक मेंढीवर पाय ठेवून तो पुढे जातो. व्हिडिओमध्ये दिसणारा कुत्रा हा सामान्य कुत्रा नसून मेंढीवर पाळत ठेवणारा कुत्रा आहे. अशा कुत्र्यांना मेंढ्या आणि मेंढ्या पाळणाऱ्या लोकांकडून प्रशिक्षण दिले जाते.
हा व्हिडिओ @HeckinGoodDogs नावाच्या अकाऊंटने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय.