मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी स्वतःचा एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी सुंदर असे कॅप्शनसुद्धा शेअर केले आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या दररोज त्यांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. त्या अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर प्रेरणादायी संदेश शेअर करते दिसतात. आता याच दरम्यान त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोला असणाऱ्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष खेचून घेतले. त्यांनी फोटोला दिलेले हे कॅप्शन सर्वांनाच आवडत आहे.
स्मृती इराणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यात त्या खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये त्या स्वतःला आरशात पाहत आहे असे दिसत आहे. चित्र शेअर करताना ‘आरशात स्वत:ला पाहा … ही तुमची स्पर्धा आहे असे कॅप्शन दिले आहे. त्याच सोबत त्यांनी #reflections ? असा हॉशटॅग देखील दिला आहे.
स्मृती इराणी दिलेल्या या कॅप्शनमुळे त्यांची पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. स्मृती इराणींनी दिलेल्या या कॅप्शना नेटकरी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा फोटो आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. यासह, अनेकांनी या फोटोवर कमेंन्टसुद्धा केल्या आहेत. एका यूजरने, ‘तुम्ही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहात’ असे लिहीले आहे. तर दुसऱ्या यूजरने, ‘तुम्ही प्रेरणादायी आहात मॅडम’ असे लिहीले आहे, तसेच ‘तुमचा फोटो आणि कॅप्शन खूपच सुंदर आहे’ अशी कमेंट केली आहे.
यापूर्वी देखील स्मृती इराणी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती दिल्लीच्या चांदणी चौकात जाताना दिसल्या होत्या. एका अहवालानुसार, स्मृती इराणी यांनी तेथे काही जलेबी खाल्ल्या आणि दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासही केला. त्या फोटोमध्ये स्मृतीने ‘एहसान तेरा मुझ पर बहुत है दिल्ली .. ️#चांदनीचौक.’ असे कॅप्शन देखील दिले आहे.
इतर बातम्या :
Video: नवरीच्या भावाने नवरा-नवरीला सोबत उचललं, आणि जमिनीवर फेकलं, अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल
Apurva Nemlekar : नवरात्रीचा चौथा दिवस; नारंगी रंग आणि जया जगदंबा मातेचा लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास अंदाजhttps://t.co/iyAIZPb3MG#ApurvaNemlekar #MarathiActress
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021