केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या फॉलोअर्ससोबत त्या कायम संभाषण करत असतात त्यासाठी त्या अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स फोटोजच्या माध्यमातून शेअर करत असतात. असाच एक फोटो त्यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे. यामध्ये स्मृती इराणी एका डिपार्टमेंटल स्टोअरमधून घरासाठी काही वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. स्मृती इराणींचा हा फोटो सोशल मीडियावरील युझर्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
स्मृती इराणी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लोकांना सांगितलं की, पत्नीचं आयुष्य कसं असतं. त्यांनी लिहिले की, “व्हेकेशन्स मध्ये फिरण्याऐवजी जेव्हा तुम्ही काम करण्यास प्राधान्य देता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की तुम्ही म्हातारे होत आहात”
सोशल मीडिया यूजर्सने या फोटोचे कौतुक करत अनेक प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्र्याच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरने स्मृती इराणी यांच्या या फोटोचे कौतुक करत लिहिले की, ‘माझी मैत्रिण मास्क लावून खूप सुंदर दिसत आहे’. याशिवाय इतरही अनेक इन्स्टाग्राम युजर्सनी या पोस्टवर हृदयद्रावक कमेंट्स केल्या आहेत.
स्मृती इराणी यांचे इन्स्टाग्रामवर 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. केंद्रीय मंत्र्यावर अनेक जण मिम्सही बनवतात. स्मृती इराणी स्वतः हे मीम्स शेअर करतात.