कॅनबेरा : सापांच्या भांडणाचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. आताही असाच एक भन्नाट व्हीडिओ समोर आला आहे. दोन विषारी सापांच्या लढाईचा एक व्हीडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. खरंतर, ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कन्झर्व्हन्सीने अलीकडेच त्यांच्या फेसबुक पेजवर एक हा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन विषारी सापांनी एकमेकांना पिळा घातला असून त्यांच्यात भांडणं सुरू आहेत. हा व्हीडिओ इतका धोकादायक आहे की हे पाहून तुम्हालाही भीती वाटेल. (snake viral video fight between two poisonous snakes)
तुम्ही व्हीडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे दोन साप एकमेकांशी भांडत आहेत. इतकंच नाही तर एकमेकांना पुन्हा पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वन्यप्रेमींनी या व्हीडिओ मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मते, सापांची ही लढाई मरे-डार्लिंग बेसिनमधील त्यांच्या स्कॉटिया वन्यजीव अभयारण्यात समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियामधील सगळ्या सापांच्या प्रजातीमध्ये मुळगा सापाचं सगळ्यात जास्त व्यापक वितरण होतं. जवळजवळ संपूर्ण खंडात हे साप आढळतात. ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या मते, या सापांच्या प्रजातींचे पुरुष एकमेकांशी कुस्ती करतात.
ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कंझर्व्हेंसीने (AWC) हा व्हीडिओ शेअर करताना असं लिहलं आहे की, “हे दोन्ही साप स्कोटिया वन्यजीव अभयारण्यात एका तासापेक्षा जास्त वेळापासून भांडण करत आहेत. हा व्हीडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.” इतकंच नाही तर यावर 300 हून अधिक लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. (snake viral video fight between two poisonous snakes)
इतर बातम्या –
रतन टाटांच्या माणुसकीला सलाम, आजारी कर्मचाऱ्याच्या भेटीसाठी थेट पुण्यात
डोकं लावून स्वत:च केली वीजनिर्मिती, या शेतकऱ्याचा फोटो व्हीव्हीएस लक्ष्मणकडून शेअर
(snake viral video fight between two poisonous snakes)