सध्या अनेकांमध्ये इन्फ्लुएंसर बनण्याची महत्त्वकांक्षा निर्माण झाली आहे. यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मनोरंजनासोबत कमाईच माध्यम सुद्धा बनले आहेत. जगात असे अनेक लोक आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो-करोडो रुपये कमवत आहेत. त्यामुळेच लोकांच कल इन्फ्लुएंसर बनण्याकडे वाढला आहे. सामान्यत: इन्फ्लुएंसर बनण्यासाठी कुठलही शिक्षण घ्यावं लागत नाही. पण असा एक देश आहे, जिथे इन्फ्लुएंसर बनण्यासाठी शैक्षणिक कोर्स सुरु होणार आहे.
आयर्लंडच्या युनिवर्सिटीत यूनिक कोर्स लॉन्च करण्यात आलाय. इथे लोकांना इन्फ्लुएंसर कसं बनायचं ते शिकवल जाईल. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर कशी ओळख बनवायची? ते विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. त्यासाठी कसा कंटेट बनवायचा त्याचे धडे दिले जातील. त्यातून जास्तीत जास्त पैसा कमावता येईल.
या कोर्ससाठी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला?
आयर्लंडच्या कार्लो शहरातील साऊथ ईस्ट टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीमध्ये हा कोर्स शिकवला जाईल. आयर्लंडची राजधानी डबलिनपासून ही यूनिवर्सिटी एक तासाच्या अंतरावर आहे. ‘कंटेंट क्रिएशन एंड सोशल मीडिया’ या कोर्सच नाव आहे. हा चार वर्षांचा ग्रॅज्युएशन कोर्स आहे. आयर्लंडमध्ये या कोर्सची वॅल्यू ग्रॅज्युएशनच्या बरोबरीची असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागच्या महिन्यात या कोर्सची सुरुवात झाली. या कोर्ससाठी 15 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. त्यांचं शिक्षण सुरु झालय.
हा क्रॅश कोर्स खूप लोकप्रिय
या यूनिक कोर्सची सुरुवात करण्याच श्रेय आयरीन मॅककोर्मिक यांना जातं. ती आधी एक टीवी प्रोड्यूसर आणि डायरेक्टर होती. कोर्स सुरु करण्याची आयडीया कुठून आली? ते तिने सांगितलं. आयरीनने सांगितलं की, गर्मीच्या दिवसात ‘डिजिटल हसल’ नावाचा एक क्रॅश कोर्स सुरु केला होता. या कोर्समध्ये प्रसिद्ध टिकटॉकर्स विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांना सोशल मीडियाबद्दल सांगायचे. हा क्रॅश कोर्स खूप लोकप्रिय झाला. त्यावेळी याच कोर्सला डिग्री लेवलच्या कोर्समध्ये बदलण्याचा विचार आयरीनच्या डोक्यात आला. त्यानंतर तिने या कोर्सची सुरुवात केली. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळतोय.