मुंबई: पूर्वीच्या काळी आपल्याकडे टीव्ही, मोबाईल आणि मनोरंजनाची इतकी साधने नसताना लोक आपला वेळ विविध खेळ खेळण्यात, पुस्तके वाचण्यात आणि ब्रेन वर्कआऊट करण्यात घालवत असत. मात्र आजही आपण टीव्ही आणि मोबाइलच्या जमान्यात असताना गणित आणि शब्दांशी निगडित कोडे लोकांना आवडतात. हे कोडे आजही खूप लोकप्रिय आहेत आणि ते सोडवून लोक आपले कौशल्य आणखी वाढवत आहेत. गणिताचे प्रश्न पाहून लोक जितके गोंधळून जातात तेवढे इतर कुठल्याही प्रश्नांमध्ये गोंधळत नाहीत. असाच एक गोंधळात टाकणारा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हे एक गणितीय कोडे आहे, जे आपल्या तार्किक बुद्धिमत्तेला आव्हान देईल. या कोड्यात काही आकडे आहेत, जे तुम्हाला योग्य प्रकारे जोडावे लागतील. मात्र ते सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी आपापल्या लॉजिकनुसार प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्यामुळेच लोकांच्या उत्तरांमध्ये फरक आहे. हे कोडे सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते सोडविणे लोकांना अवघड जात आहे. चित्रातील प्रश्न असा आहे की 3+2=43, 4+3=54 आणि 5+4=65, तर 9+5 चे उत्तर काय असेल?
आता ती सोडवताना लोकांची अवस्था बिकट होत चालली आहे. काही लोकांची उत्तरे जुळत असली तरी अनेकांनी तर्क लावून प्रतिसाद दिलाय. एका युजरने लिहिले, ‘उत्तर 79 असेल’, तर दुसऱ्याने आपला युक्तिवाद सिद्ध करत उत्तर 109 असल्याचे सांगितले. तर काही जणांचे उत्तर 106 असे होते.