अनेक प्रकारचे फनी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. यातील काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमाचा गुण असा आहे की आपण या हे फोटो आपल्याला गोंधळात पाडतात. ते आपल्याला कन्फ्युज करतात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतोय तेच सत्य आहे, असा विश्वास वाटतो. तसं मुळीच नसतं. असाच एक फोटो समोर आलाय, ज्यात एका रुममध्ये एका मुलाचा बूट हरवलाय. चित्रात बूट कुठे आहे ते शोधून दाखवा.
तुम्ही बघू शकता, या खोलीत अनेक गोष्टी विखुरलेल्या आहेत आणि हा मुलगा खोलीत त्याच्या बेडवर बसलेला आहे.
या मुलाच्या एका पायात बूट आहे आणि त्याच्या दुसऱ्या पायातला बूट बेपत्ता आहे. हा जोडा शोधा आणि खोलीत कुठे पडलाय ते सांगा.
ऑप्टिकल भ्रमाच्या या अशा चित्रांमुळे मानवी मेंदूचे निरीक्षण कौशल्य वाढण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर एखाद्या चित्राबद्दल बोलताना आपला मेंदू कसा काम करतो हे आपल्याला समजतं.
फोटोमध्ये या मुलाच्या एका पायात बूट आहे, दुसऱ्या नाही. पण हा दुसरा बूट आपल्याला सहज दिसत नाही. खूप निरखून पाहिलं तर हा बूट नक्की सापडू शकतो.
मुलाच्या डाव्या बाजूला एक छोटं कपाट आहे ज्याला रंगीबेरंगी ड्रॉवर आहेत. त्याच्या शेजारी एक छोटी ट्रंक पडलेली आहे. या ट्रंक मधून बरंच सामान बाहेर पडलेलं दिसतंय. याच ट्रंकला लागून तुम्हाला एक बूट दिसेल.