हा श्रावणबाळ पाहिला का, भावुक करणारा व्हिडीओ!

| Updated on: Apr 22, 2023 | 5:52 PM

आजकाल याच्या उलटदेखील घडतं. मुलं आपल्या आईवडिलांना त्यांच्या उतार वयात सांभाळत नाहीत. बरेचदा वयस्कर लोकांचे हाल होताना सुद्धा आपण पाहतो. अशावेळी दुसऱ्यासाठी वाईट वाटण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसतं. पण हेच जर कुणी खूप जीव लावत असेल तर आपल्याला त्याचं फार कौतुक वाटतं.

हा श्रावणबाळ पाहिला का, भावुक करणारा व्हिडीओ!
parents love
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: मुलं आई-वडिलांची काळजी घेणं हे भारतात काही नवीन नाही. या देशात मुलं ज्या संस्कृतीत मोठी होतात, ते पाहता त्यांना आई-वडिलांची काळजी घ्यावीच लागते, असं जवळपास गृहित धरलं जातं. आजकाल याच्या उलटदेखील घडतं. मुलं आपल्या आईवडिलांना त्यांच्या उतार वयात सांभाळत नाहीत. बरेचदा वयस्कर लोकांचे हाल होताना सुद्धा आपण पाहतो. अशावेळी दुसऱ्यासाठी वाईट वाटण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसतं. पण हेच जर कुणी खूप जीव लावत असेल तर आपल्याला त्याचं फार कौतुक वाटतं. असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला अश्रू अनावर होतील असा हा व्हिडीओ आहे. हा लहान मुलगा आपल्या आई-वडिलांची सायकल ढकलून त्यांना फ्लायओव्हरवर चढायला मदत करतोय. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ती ट्विटरवर शेअर केल्यानंतर ती व्हायरल होत आहे.

उड्डाणपुलावर ढकलतोय आई-वडिलांची सायकल

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फ्लायओव्हरवर सायकल चालवताना दिसतोय. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसा एक लहान मुलगा आपल्या पालकांना उड्डाणपुलावरून जाण्यासाठी सायकल ढकलताना दिसत आहे. मूल महत्वाची जबाबदारी एन्जॉय करताना दिसत आहे हा सगळा प्रकार बघून बाजूने जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आल्याशिवाय राहत नसेल. मुलगा सुद्धा आई वडिलांची सायकल ढकलता ढकलता हसतोय. तीन लाखांहून अधिक व्ह्यूज असलेल्या या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली.

आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” असंच आयुष्यभर आई-वडिलांचा आधार व्हावं.” आई-वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे लोक आहेत जे जन्मापासूनआपल्या विकासाच्या सर्व महत्वाच्या टप्प्यांवर आपल्याला मदत करतात. ते आपल्या जीवनात नेहमीच आपल्यासोबत असतात आणि जीवनातील प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्यास मदत करतात. एका युजरने तर लिहिलं, ‘संस्कार रक्तात असतात.’