सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे हे स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव याच गावातील दत्तात्रय लोहार यांनी त्यांच्या कारागीरीतुन मिनी जिप्सी तयार केली आहे. या मिनी जिप्सीचा देशात चर्चेचा विषय झाला आहे. आनंद महिंदा यांनी तर त्यांना बोलेरोची ऑफर दिली. यातच दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी दत्तात्रय लोहार तयार केलेल्या मिनी जिप्सीवर गाणं तयार केले आहे. गाडी पॉम पॉम, गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटार, या गाडीला दत्ताभाऊ डायवर. असे गाणे त्यांनी यावर रचले आहे. त्यामुळे ही जीप्सी आणि हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.
अधुनिकतेला लोकसंगीताची जोड
पलूस येथे राहणाऱ्या सरस्वती उर्फ सरुताई धडे यांनी दत्तात्रय लोहार यांच्या घरी भेट दिली आणि या मिनी जिप्सी वर गाणं रचले आहे. ‘गाडी पॉम पॉम…गाडी पॉम पॉम…कशी वाजते मोटार,,, या गाडीला दत्ताभाऊ डायवर,,, या गाडीला लोहार डायवर ,गाडी पॉम पॉम,,,कशी वाजते मोटार, या गाडीला वहिनी डायवर,,,या गाडीला दत्ता भाऊ डायवर,,, बाई कडेगाव तालुक्यात हाय देवराष्ट्रे गाव ,,,यशवंतराव चव्हाणांचे बाई हे देवराष्ट्रे हे गाव,,,गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटर,,, या गाडीला दत्ता भाऊ डायवर,,, बाई हाताची हाय ही कला ,,,हाताची हाय ही कला महाराष्ट्रात प्रसाद दिला,,,गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटर,,,या गाडीला दत्ताभाऊ डायवर. या गाण्यामुळे याला लोकसंगीताचीही जोड मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट देऊन गाडीचा फेरफटका मारत दत्तात्रय लोहार याचे कौतुक केले होते आणि आता दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी दत्तात्रय लोहार यांची भेट घेऊन हे गाणे तयार केलेने तालुक्यात सर्वत दत्तात्रय लोहार याचे कौतुक होत आहे.