माद्रिद : इतिहासाच्या पुस्तकात किंवा पौराणिक कथांमध्ये आपण वाचतो, की पूर्वीच्या काळी राजा-महाराजांना शेकडो-हजारो राण्या होत्या. राजाच्या जितक्या जास्त राण्या, तितकी त्याची ख्याती अधिक. कालांतराने, अनेक देशांतील राजेशाही संपुष्टात आली आणि लोकांच्या विचारांमध्ये बदल झाले. पण प्राचीन काळातील एका अशा राजाची गोष्ट समोर आली आहे, ज्याने 50-100 नव्हे तर तब्बल 5000 महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत.
1975 मध्ये स्पेनच्या राजगादीवर
स्पेनच्या रॉयल फॅमिलीतील पायउतार झालेला राजा जुआन कार्लोस (Juan Carlos) याच्याशी संबंधित ही घटना सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अलिकडेच त्याचे कारनामे जगासमोर आले आहेत. ती ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 1975 मध्ये स्पेनच्या राजाचे सिंहासन स्वीकारलेल्या जुआन कार्लोस याच्या जीवनाशी संबंधित ही गोष्ट स्पेनच्या माजी पोलीस आयुक्तानेच उघड केली आहे. हा राजा अत्यंत रंगेल, किंबहुना सेक्स अॅडिक्ट असल्याचे बोलले जाते.
लग्नानंतरही लैंगिक भूक शमेना
क्वीन सोफियासोबत जुआन कार्लोसचे लग्न झाले होते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, तत्कालीन राजा जुआन कार्लोस याचे हवस इतकी वाढली होती, की त्याच्यामुळे देशाचीही बदनामी व्हायला लागली होती. राजाच्या या वाईट सवयीमुळे त्याची जनताही खूप अस्वस्थ होती. जुआन कार्लोसची ही वाईट व्यसन स्पेनचे माजी पोलीस आयुक्त जोस मॅन्युअल यांनी संसदीय सुनावणीदरम्यान उघड केली. त्यांनी सांगितले की कार्लोसचे थोड्या-थोडक्या नव्हे, तर तब्बल 5000 महिलांशी संबंध होते.
पुरुष संप्रेरक कमी करण्यासाठी उपाय
जोस मॅन्युअल म्हणाले की, जुआन कार्लोस हा सेक्स अॅडिक्ट झाला होता, त्याचे व्यसन ही देशासाठी गंभीर समस्या ठरली होती. जोस मॅन्युअलने खुलासा करताना सांगितले की राजाच्या या समस्येपासून मुक्त होण्यासाठी त्याच्या शरीरात महिलांचे हार्मोन्स घालावे लागले होते. त्यांच्या शरीरातील पुरुष संप्रेरक कमी करण्यासाठी हे करावे लागले होते. किंग जुआनवर एक पुस्तकही लिहिले गेले आहे.
प्रिन्सेस डायनालाही गर्लफ्रेण्ड होण्याची गळ
एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की जुआनने प्रिन्सेस डायना यांनाही आपली गर्लफ्रेण्ड होण्यासाठी संपर्क साधला होता, परंतु या दाव्याला पुष्टी मिळालेली नाही. त्याच वेळी, एका स्पॅनिश इतिहासकाराने त्याच्यावर ‘जुआन कार्लोस: द किंग ऑफ 5,000 लव्हर्स’ (Juan Carlos: The King Of 5,000 Lovers) नावाचे पुस्तक लिहिले आहे. स्पॅनिश गायिका, बेल्जियमची गव्हर्नर आणि इटालियन राजकुमारी यांच्याशीही कार्लोसचे संबंध असल्याचे सांगितले जाते.
6 महिन्यांत 62 महिलांशी लैंगिक संबंध
इतिहासकाराने लिहिलेल्या पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की जुआन कार्लोसने केवळ 6 महिन्यांत 62 महिलांशी लैंगिक संबंध ठेवले होते. सध्या तो अबू धाबीमध्ये राहतो. पैशांचा गैरवापर केल्याबद्दल त्याला देशातून हद्दपार करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. स्पेनच्या गल्ल्यांमध्ये त्याच्या रंगेलपणाच्या चर्चा अजूनही प्रसिद्ध आहेत.
संबंधित बातम्या :
हस्तमैथून करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पंतप्रधानाला तत्काळ द्यावा लागला राजीनामा