मुंबई: ही व्हायरल व्हिडिओ तुम्ही स्वतःच्या रिस्कवर बघा, कारण हा व्हिडीओ पाहून तुम्ही खूप हसणार आहात. हसून हसून लोटपोट व्हाल असा हा व्हिडीओ आहे. खरं तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं इंग्रजी चांगलं नाही. ते अजिबात योग्य नाही असे म्हणा. असं असून सुद्धा ही व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासाने इंग्रजी बोलते की बास्स. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही गोंधळून जाल. काहीही म्हणा पण आयुष्यात इतका कॉन्फिडन्स हवा!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराच्या बाजूला नदीजवळ उभा राहून तिथल्या सौंदर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो आपला मुद्दा इंग्रजीत मांडतोय. तो ज्या पद्धतीने इंग्रजीत बोलतो, त्यामुळे लोक हसत-खेळत असतात. ही व्यक्ती सांगण्याचा प्रयत्न करते की आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि इथलं सौंदर्य पाहा.
मजेशीर इंग्रजी बोलणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर syapa_ielts_da नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत जवळपास 4 लाख लोकांनी त्याला लाइक केले आहे. त्याचवेळी युजर्स देखील जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने लिहिलं, आयुष्यात फक्त एवढाच आत्मविश्वास हवा. एकाने लिहिलं, “लो भैया आज इंग्रजांचे निधन झाले.” एकंदरीतच या माणसाने आपल्या अफाट इंग्रजीने सर्वांना चकीत केले आहे. लोक हसून हसून वेडे झाले आहेत.