Video: मुल्क मराठों का शिवाजी यहाँ डोला था, मराठ्यांच्या पोरांनी मैदान मारलं, शिल्पा शेट्टीच्या काळजाचा ठोका चुकला, तुमचाही चुकणार, गॅरंटी !

| Updated on: Feb 16, 2022 | 4:08 PM

सोनी टीव्हीच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' (India’s Got Talent) या टॅलेंट रिअॅलिटी शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या नवीन सिझनमध्ये अनेक खतरनाक ॲक्टस आतापर्यंत बघायला मिळाले आहेत. इंडियाज गॉट टॅलेंटची जादू पुन्हा एकदा बघायला मिळते आहे.

Video: मुल्क मराठों का शिवाजी यहाँ डोला था, मराठ्यांच्या पोरांनी मैदान मारलं, शिल्पा शेट्टीच्या काळजाचा ठोका चुकला, तुमचाही चुकणार, गॅरंटी !
इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये शिवाजी महाराज यांच्यावर एक खास अॅक्ट् सादर करण्यात आला.
Follow us on

मुंबई : सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India’s Got Talent) या टॅलेंट रिअॅलिटी शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या नवीन सिझनमध्ये अनेक खतरनाक ॲक्टस आतापर्यंत बघायला मिळाले आहेत. इंडियाज गॉट टॅलेंटची जादू पुन्हा एकदा बघायला मिळते आहे. स्पर्धक सोनेरी बजर मिळविण्यासाठी तारेवरची कसरत देखील करताना दिसत आहेत. शोचे जज किरण खेर (Kirron Kher), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), रॅपर बादशाह मनोज मुंतशीर हे आहेत.

शिवाजी महाराज की जय इंडियाज गॉट टॅलेंट मंचावर घोषणा…

इंडियाज गॉट टॅलेंटमधील एक ॲक्ट बघितल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावर एक सुपर से भी उपर वाला ॲक्ट नुकताच सादर करण्यात आला. इतकेच नव्हेतर इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज की जय…, जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या. स र र र होलिका जले शत्रु राख में मिले…या गाण्यावर खास ॲक्ट सादर करत छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट दाखवण्यात आली आहे. हे सर्व बघताना अक्षरशा अंगावर शहारे येतात.

इथे पाहा शिवाजी महाराज ॲक्टचा खास व्हिडीओ

हा ॲक्ट बघताना किरण खेर, मनोज मुंतशीर यांना देखील खाम फुटला. तर शिल्पा शेट्टीच्या काळजाचा ठोकाच चुका. ॲक्ट संपल्यानंतर शिल्पा शेट्टी म्हणाली की, मी हा ॲक्ट ज्यावेळी बघत होते तेंव्हा मला खूप भिती वाटली. कारण जो मुलगा ॲक्टदरम्यान वरती फेकला होता, तो सरळ छताला लागला आणि मला वाटले की, आता आमच्या छताला मोठे छिद्रच पडेल. खूप छान ॲक्ट आणि यालाच म्हणतात छापा मार परफॉर्मन्स. तर रॅपर बादशाह मनोज म्हणाले की, या अगोदर केशरी चित्रपट आला होता. तो चित्रपट 2 ते 2.30 तास बघितल्यानंतर एक जोश येतो माणसाला तसाच सेम जोश हा तुमचा दोन मिनिटांचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर येतो.

संबंधित बातम्या : 

VIDEO : हम भी किसी से कम नहीं… म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या…

Video : जिंदगी एक सफ़र है सुहाना…! तुम्ही कधी माकडाला सायकल चालवताना पाहिले आहे का? पाहा व्हायरल व्हिडिओ…