मुंबई : पुष्पा (Pushpa The Rise) सिनेमा हिट झाला. त्याआधीच हिट झाली होती या सिनेमातील गाणी (Pushpa The Rise Song Jukebox). पुष्पा द राईज या सिनेमातलं सगळ्यात आधा तुफान गाजलेलं गाणं होतं, ते म्हणजे सामी सामी (Saami Saami). त्यानंतर समांथाच्या (Samantha) आयटम सॉन्गनेही (Pushpa Item Song) धुमाकूळ घातला. पण आता सगळीकडे या दोन्ही गाण्यांपेक्षा जास्त क्रेझ आहे ती स्रीवल्ली या गाण्याची. पुष्पामधील स्रीवल्ली या गाण्याच्या प्रेमात अनेकजण पडले आहे. उशिरानं का होईना, सिनेमाच्या रिलीजनंतर हे गाणं आता सगळ्यांना भुरळ पाडतंय. मुळच्या तेलुगूमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पा सिनेमाची गाणी ही मल्याळम, तमिळ आणि हिंदीतही करण्यात आली. पण स्रीवल्ली (Srivalli Song From Pushpa) हे गाणं चक्क मराठीतही एकानं साकारलं आहे.
स्रीवल्लीचं मराठी वर्जन (Marathi Version) ऐकून रसिकांनीही हे गाणं मराठी करणाऱ्या अवलियाला दाद दिली आहे. विजय खंदारे यांनं आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलंय. हे गाणं विजय यानं फक्त मराठीत रचलं नाहीये, तर या गाण्याला व्हिडीओतूनही उतरवलंय.
एक गोंडस लव्हस्टोरी, मराठी स्रीवल्ली या गाण्यात दिसून आली आहे. जणू काही मराठीतच हे गाणं साकारलं गेलं पहिल्यांदा, असा भास स्रीवल्लीचं ओरीजनल न ऐकलेल्याला होऊ शकतो.
विजय खंदारेनं 3 मिनिटं 44 सेकंदाचा हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यानं (Mobile Camera) तयार केलाय. विजय खंदारे, तृप्ती खंदारे यांनी या व्हिडीओमध्ये काम केलंय. तर स्वतः विजय खंदारे यांनीच या व्हिडीओ निर्देशनही केलंय. तर गाणं लिहिलं आणि गायलंही विजयनेच आहे. त्यासोबत राधिका नागरमोटे, सुहासिनी गुल्हाने, मनिश पतंग्रे, रोशन चौधरी यांनीह या व्हिडीओ काम केलं असून कॅमेऱ्यामन म्हणून आचल खंदारेनं जबाबदारी सांभाळली आहे.
अमरावतीमधल्या श्रीनिवास या स्टुडिओमध्ये स्रीवल्लीच्या मराठी वर्जनचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. अवघ्या 12 दिवसांत या व्हिडीओनं सात लाखांपेक्षा जास्त व्हूज मिळवले आहेत. तर 41 हजारपेक्षा जास्त लोकांना हे गाणं आवडलंय. 29 डिसेंबरला स्रीवल्ली या गाण्याचा व्हिडीओ अपलोड (You Tube Upload) करण्यात आला होता. विजय खदारे यांनी केलेलं स्रीवल्ली मराठी वर्जनं अनेकांना आवडलं असून त्याचा व्हिडीओही आवडल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी कमेंट करत दिल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 73 हजारपेक्षा जास्त लोकांनी विजय यांच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब केलंय.
आता ज्यांनी हे गाणं मूळ भाषेत ऐकलं नाहीये, त्यांनी ते ही ऐकून घ्यायलंच पाहिजे!
‘मिसेस मुख्यमंत्री’ची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सुमी-पायलट करणार ‘दिशाभूल’