एसटी बस चालकाने चूक दाखवत म्हटले, “सांगा मी बसमध्ये कसं चढायचं”, पुण्यातील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

| Updated on: Jan 14, 2025 | 9:16 PM

Viral Video news: नवीन बसेस संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बसमध्ये चढण्यासाठी चालकाचा दरवाजा दुसरीकडे आणि पायऱ्या दुसरीकडे आहेत. त्यामुळे चालक प्रश्न विचारतोय "सांगा मी कस चढायचं", असा हा व्हिडिओ आहे.

एसटी बस चालकाने चूक दाखवत म्हटले, सांगा मी बसमध्ये कसं चढायचं, पुण्यातील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
एसटी बसचा व्हायरल व्हिडिओ
Follow us on

Viral Video: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था दयनीय झाली आहे. महामंडळ तोट्यात असल्यामुळे अनेक वर्षांपासून नवीन बसेसची खरेदी केली गेली नाही. महामंडळाने १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या बसेस मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महामंडळ इलेक्ट्रीक बसची संख्या वाढवणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात काही नवीन बसेस आल्या आहे. या नवीन बसेस संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बसमध्ये चढण्यासाठी चालकाचा दरवाजा दुसरीकडे आणि पायऱ्या दुसरीकडे आहेत. त्यामुळे चालक प्रश्न विचारतोय “सांगा मी कस चढायचं”, असा हा व्हिडिओ आहे.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये

pune_trending_ या इन्स्टाग्राम पेजवरून एसटी बस चालकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये नवीन आलेली एसटी दाखवली आहे. त्या एसटीचा दरवाजा वेगळ्या ठिकाणी आहे. परंतु एसटी चालकाला चढण्यासाठी दिलेल्या पायऱ्या खिडकीजवळ आहे. यामुळे बस बनवताना खिडकीतून चालक जाणार की काय? अशी अपेक्षा होती की काय? असा प्रश्न पडला आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओत चालक काय म्हणतोय…

व्हिडिओमधील चालक म्हणतो, चालकाच्या चढण्यासाठी या पायऱ्या बनवल्या आहे. मी दोन पायऱ्या चढलो. पण आता पुढे कसा चढू. कारण त्या ठिकाणी दरवाजाच नाही. त्या ठिकाणी खिडकी आहे. त्यानंतर चालक चालत पुन्हा दरवाजाकडे येतो. मग दरवाजा उघडतो. त्यानंतर दरवाज्यात कसा चढू असा प्रश्न विचारत आहे. सांगा आता तुम्हीच न्याय द्या, असे हा चालक म्हणत आहे.

एसटी बस चालकाने एसटी प्रशासनाची चूक दाखवून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’चे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी पिंपरी- चिंचवडमधील वल्लभनगर बसस्थानक गाठले. त्यांनी एसटी बस चालकांशी संवाद साधला. यावेळी चालक आपण प्रवाशी बाजूने चढत असल्याचे म्हटले आहे. चालकाच्या केबिनमध्ये चढण्यास आणि उतरण्यास किती कसरत करावी लागत आहे, ते पाहिले. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत.