हे गाव लई न्यारं… झुमका तिचा हरवला अन् धडधड यांची वाढली; इयररिंग शोधण्यासाठी सोम्यागोम्यांची गर्दी

| Updated on: Aug 24, 2024 | 4:18 PM

लोकं म्हणतात माणूसकी मेली. कलियुग आलंय. पण तसं नाहीये. माणुसकी अजूनही जिवंत आहे. तुम्ही कोणत्याही देशात जा, जिथे मानवी वस्ती आहे, तिथे माणुसकीचा झरा अखंड वाहत आहे. तुम्हाला कदाचित अनुभव आला नसेल. पण येथील एका तरुणीला त्याचा अनुभव आलाय. काय घडलं बुवा असं?

हे गाव लई न्यारं... झुमका तिचा हरवला अन् धडधड यांची वाढली; इयररिंग शोधण्यासाठी सोम्यागोम्यांची गर्दी
strangers
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जगात जसे वाईट लोक असतात तसे दयाळू, प्रेमळ लोकही असतात. अनेकदा अनोळखी लोकं खूप प्रेमाने वागताना दिसतात. तुमच्या मदतीला धावून येतात. पण ओळखीचे लोक कधी मदतीला धावून येत नाही. अमेरिकेतही अशा दयाळू आणि प्रेमळ लोकांची काही कमी नाही. एका तरुणीला त्याची प्रचितीही आली आहे. तिच्या मदतीसाठी एक दोन नव्हे अनेक तरूण धावून आले. जीवाच्या आकांताने धावाधाव करत होते. तरुणी मात्र, मस्तपैकी गंमत पाहात होती.

Emma Hughes नावाच्या मुलीने हा किस्सा शेअर केला आहे. आम्ही म्युझिकल कॉन्सर्टमधून बाहेर पडलो. आमच्यासोबत असलेल्या एका मुलीचा झुमका (कर्णफुले) पडला. आम्ही तिचा झुमका शोधायला सुरुवात केली. रात्रीची वेळ होती. विशेष म्हणजे आमच्यासोबत तिथे असलेल्या सर्वच अबालवृद्धांनी झुमका शोधायला सुरुवात केली. बघता बघता प्रचंड गर्दी झाली. जो तो रस्त्यावर झुमका शोधत होता. अनेकांनी तर मोबाईलचा टॉर्च लावून झुमका शोधायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे झुमका शोधणारे हे सर्वजण अनोळखी होते. त्या तरुणीच्या परिचयाचा एकही नव्हता, असं एमाने म्हटलंय.

असं कसं म्हणता येईल?

एमाने तिच्या अकाऊंटवर हा व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात तरुणीचा झुमका शोधण्यासाठी किती गर्दी झालीय हे दिसून येतंय. विशेष म्हणजे या गर्दीत काही तरुण असेही होते की त्यांना आपण काय शोधतोय ते माहीत नव्हते. इतर लोक काही तरी शोधतात म्हणून तेही शोधायला लागले होते. या गर्दीतील एकाने दुसऱ्याला सवाल केला की, आपण काय शोधतोय? दुसरा म्हणतो, एक इयररिंग. एमा म्हणते, एकूण 14 लोक तरी इयररिंग शोधत होते. पुढे ती गंमतीने म्हणते की, आता तुम्हीच सांगा मानवतेवर विश्वास नाहीये असं कसं म्हणता येईल. मला कधी कधी माणसंही आवडतात.

हे काय कमी आहे?

या पोस्टमध्ये एमा शेवटी म्हणते, असो. झुमका काही सापडला नाही. पण एवढी प्रेमळ माणसं मिळाली हीच मोठी गोष्ट आहे. एमाने हा व्हिडीओ शेअर करताच 10 मिलियन लोकांनी तो पाहिला. त्याशिवाय शेकडो लोकांनी त्यावर कमेंट केलीय. काही लोकांनी तर त्यांच्यासोबत घडलेले असे प्रेमळ किस्सेही शेअर केले आहेत.

 

यूजर्सचे किस्से

एका मुलीने तिचा असाच एक किस्सा शेअर केलाय. ही मुलगी म्हणते, एकदा मी माझ्या आजीची रिंग हरवली होती. मी शोधत होते. पण ही रिंग शोधण्यासाठी मोठी गर्दी झाली. शेवटी या लोकांनी मला रिंग शोधून दिली. एकजण म्हणतो, आपल्याला असंच तर झालं पाहिजे. माणसाला माणसाबद्दल प्रेम असलं पाहिजे. दुसरा यूजर्स म्हणतो, आज इंटरनेटवर मी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत.