सोशल मीडियावरील एका प्रेमकथेकडे लोकांचं खूप लक्ष जातंय. या कथेबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला एखाद्या सिनेमाची स्क्रिप्टही मिळू शकते. पण ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर या प्रेमकथेविषयी एक पोस्ट करण्यात आली होती. ही प्रेमकहाणी तुम्हालाही आश्चर्यचकित करू शकते. स्टँडअप कॉमेडीमध्ये अनेकदा बेंगळुरूच्या ट्रॅफिकचा उल्लेख केला जातो. पण हे ट्रॅफिक म्हणजे कुणाच्या तरी जीवनाला कलाटणी देणारा क्षण असू शकतो, याचा विचारही कुणी केला नसेल.
रेडिटवर शेअर केलेली ही स्टोरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कमी शब्दात सांगण्यात आलीये. बंगळुरुच्या सोनी वर्ल्ड सिग्नलने दोन मित्रांचं आयुष्यच बदलून टाकलं. आधी तुम्ही ही ट्विटरवरची पोस्ट वाचा…
Top drawer stuff on Reddit today ??@peakbengaluru pic.twitter.com/25H0wr526h
— Aj (@babablahblah_) September 18, 2022
खरं तर या कपलमध्ये आधीच मैत्री होती. पण प्रेमासारख्या भावनेचा त्याने कधीच विचार केला नाही. एक दिवस हा मुलगा आपल्या मैत्रिणीला सोडायला जाणार होता, तेव्हा दोघेही वाहतूक कोंडीत अडकले.
जाममध्ये अडकल्यामुळे दोघांनाही भूक लागली आणि दोघांनीही त्या दिवशी एकत्र जेवण केलं. इथूनच या कपलची लव्हस्टोरी सुरु झाली आणि 3 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न केले.
आता या जोडप्याच्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत, परंतु ईजीपुरा उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप सुरू आहे. लोकांना या कपलची लव्हस्टोरी खूप आवडते.
बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही की बंगळुरूच्या रहदारीमुळे कोणाला असा फायदा होऊ शकतो.