तुम्ही कधी परीक्षेत कॉपी केलीये का? केली असेल तर कधी पकडला गेला आहात का? काही काही शिक्षक कमाल असतात त्यांना बरोबर माहित असतं कॉपी लपवलीये कुठं! सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना बालपण आठवेल. खरं तर एका विद्यार्थ्याल परीक्षा हॉलमध्ये जायचं होतं. पण शिक्षकांनी अशी काही तपासणी केली की त्याची हुशारी पकडली गेली. विद्यार्थ्याने त्याच्या जीन्स मध्ये कॉपी लपविली होती. अशी काही हुशारी केलीये की तुम्हीच बघा…
45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी रांगेत उभे राहून शिक्षक परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांची झडती घेताना दिसत आहेत.
विद्यार्थ्यांना बूट काढायला सांगितले जाते. एखादा विद्यार्थी जेव्हा पुढे जाणार असतो, तेव्हा शिक्षक त्याला पँट सुद्धा वर करून दाखवायला सांगतायत.
एक विद्यार्थी भीतीपोटी त्याची जीन्स वर करतो. शिक्षकांना कॉपी दिसताच ते म्हणतात “हा काय कॉपीचा समुद्र आहे काय?” हे पाहून शिक्षक म्हणतात तुम्ही वर्षानुवर्षं अभ्यास करणार नाही.
बचपन में आपने नकल करने के लिए कभी ऐसी हरकत की है ?? ?? pic.twitter.com/tJKo8FyJuJ
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 13, 2022
ट्विटर हँडलवरून हा मजेशीर व्हिडिओ शेअर @Gulzar_sahab आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- लहानपणी तुम्ही कधी कॉपी करण्यासाठी असे कृत्य केले आहे का??
या क्लिपला आतापर्यंत 6 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अडीचशेहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. विद्यार्थ्याची नक्कल पाहून अनेक युजर्सना हसू आवरता येत नाही. एका व्यक्तीने लिहिले – अनुकरणासाठी तुम्हाला बुद्धिमत्तेचीही गरज असते.