चांगल्या शिक्षणानेच माणूस या जगात यश मिळवू शकतो. पण दुर्दैवाने प्रत्येकजण इतका भाग्यवान नाही ज्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्याचा किंवा प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याचा अधिकार मिळेल. बरेच लोक यापासून वंचित असतात. त्यांच्यात इतकी क्षमता नसते. मात्र, चिकाटीने अभ्यास करणारे काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर वाट्टेल ते मिळवू शकतात अगदी शिक्षण सुद्धा! दारिद्र्यात जगणारे लोक शाळेत जाणं थांबवू शकत नाही. शिक्षणाचं खरं महत्त्व याच लोकांना माहित असतं.
असे लोक आहेत जे सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आणि साक्षर होण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार आहेत.
असाच एक प्रेरणादायी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक मुलगी फुटपाथवर स्ट्रीट लाइटखाली वाचताना दिसत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ stutes_zone_987 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगी आपल्या शाळेच्या ड्रेसमध्ये स्ट्रीट लाईटखाली आपल्या वहीत काहीतरी लिहिताना दिसत आहे.
रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेली ही मुलगी कुठेही इकडे तिकडे लक्ष न देता अभ्यास करण्यात मग्न दिसते. समोरून कुणीतरी तिचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला हे सुद्धा तिला माहीत होत नाही.
तिचं इतकं मन लावून अभ्यास करणं इंटरनेटवर बऱ्याच लोकांना भावलंय. अनेक लोकांना यातून प्रेरणा मिळालीये. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इन्स्टाग्राम युझरने लिहिले की, ‘आजचा बेस्ट व्हिडिओ’.
दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला जवळपास 7000 लोकांनी लाईक केलं आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.