मुंबई : आज 21 जून…जगभरात आजचा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे. आजपासून दक्षिणायनाला प्रारंभ होणार आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस ओळखला जातो. या खगोलीय घटनेला Summer Solstice म्हणून ओळखले जाते. (Summer Solstice 2021 longest day of year)
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा दिवस मोठा म्हणजे 13 तास 14 मिनिटांचा असणार आहे. तर रात्र लहान म्हणजेच 10 तास 46 मिनिटांची असेल. त्यामुळे आज उत्तरगोलार्धात दिवस मोठा असणार आहे
समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. 21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. तो दिवस मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. जगातल्या अनेक देशांमध्ये हा दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो.
22 डिसेंबर हा वर्षातला सर्वांत लहान दिवस
आता सूर्य दक्षिणेकडे जाऊ लागेल. तसेच 23 सप्टेंबरला तो विषुववृत्तावर येईल. त्यावेळी दिनमान रात्रीमान समान होईल. त्यानंतर २१ डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर येईल. त्यावेळी आपल्या इथे रात्र मोठी आणि दिवस लहान होईल. विशेष म्हणजे 22 डिसेंबर हा वर्षातला सर्वांत लहान दिवस असतो. त्यानंतर पुन्हा तो 21 मार्चला तो विषुववृत्तावर येईल.
21 जूनचे महत्त्व काय?
अनेक देशांमध्ये 21 जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो. मराठी पंचांगांमध्येही 21 जूनची नोंद ‘वर्षा ऋतू प्रारंभ’ अशी केली जाते. पश्चिमेतल्या देशांमध्ये 21 जूनच्या दिवशी ‘Spring’ म्हणजे वसंत ऋतू संपतो आणि ‘Summer’ म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. तर पश्चिमेकडच्या देशांमध्ये Autumn म्हणजे पानगळीचा मोसम सुरु होतो. (Summer Solstice 2021 longest day of year)
संबंधित बातम्या :
VIDEO | बीडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघे थोडक्यात बचावले
PHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड
Video | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच