Video: मालकाच्या प्रत्येक शब्दाला प्रतिसाद देणारी मांजर, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ही खूप हुशार आहे!

| Updated on: Oct 16, 2021 | 4:01 PM

व्हिडिओमध्ये पाहू शकतेा की, मालकाची मांजर झोपली आहे, खात आहे, विचार करत आहे, पाहत आहे किंवा काहीही करत आहे, जेव्हाही तिचा मालक तिला तिच्या नावाने हाक मारतो, ती लगेच पाहते

Video: मालकाच्या प्रत्येक शब्दाला प्रतिसाद देणारी मांजर, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ही खूप हुशार आहे!
मालकाच्या प्रत्येक शब्दाला प्रतिसाद देणारी मांजर
Follow us on

मेंदू आणि बुद्धी ही प्रत्येकाला असते. पण प्रत्येकाची ती वापर करण्याची पद्धत वेगळी असते. माणसापासून ते प्राण्यांपर्यंत ते त्यांच्या मेंदूचा वापर करत आले आहेत. असं म्हटलं जाते की, प्राण्यांमध्ये माणसापेक्षा जास्त बुद्धी असते. ते जास्त मेंदूचा वापर करतात. तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर मांजरीचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील, पण आता जो व्हिडिओ समोर आला आहे तो खूपच भारी आहे. व्हिडिओमध्ये एक मांजर दिसत आहे. जेव्हाही तिचा मालक तिला तिच्या नावाने हाक मारतो, ती लगेच प्रतिसाद देते किंवा प्रतिक्रिया देते. (Sweet kitty always responds to his name watch viral video on viral hog)

व्हिडिओमध्ये पाहू शकतेा की, मालकाची मांजर झोपली आहे, खात आहे, विचार करत आहे, पाहत आहे किंवा काहीही करत आहे, जेव्हाही तिचा मालक तिला तिच्या नावाने हाक मारतो, ती लगेच पाहते किंवा ऐकते. व्हिडिओमध्ये तिचा मालक तिला अनेक वेळा तिच्या नावाने हाक मारतो, ती पटकन प्रतिक्रिया देते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पॉप्युलर होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडीओ व्हायरल हॉगच्या पेजवर पाहू शकता. याशिवाय हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पाहिला जात आहे. लोक व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओवर 27 हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. यासोबतच अनेक लाईक्सही पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ शेअर करताना, पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ही गोंडस किटी नेहमी तिचे नाव ऐकल्यानंतर प्रतिसाद देते.

व्हिडीओ पाहा:

व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत, त्यात एकाने म्हटलं आहे की, ‘ही मांजर खूप बुद्धिमान आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘माझी इच्छा आहे की, माझ्याकडेही अशी मांजर असावी’ याशिवाय, अनेकांनी इमोजीज वापरुन प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पाहा:

Video: 2 कोल्ह्यांवर 1 मांजर भारी, मांजरीला यापुढे भित्री म्हणण्याआधी तिच्या धाडसाचा हा व्हिडीओ पाहा

Video: मांजरीच्या पिलाला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं, लोक म्हणाले, अजून माणुसकी जिवंत आहे!