Hassan Ali | हसन अलीच्या त्या चुकीने भारतीय खुश, म्हणाले ‘मॅन ऑफ द मॅन’ तर हाच

| Updated on: Nov 12, 2021 | 2:22 PM

या सामन्यात एक क्षण असाही आला होता की पाकिस्तान हा सामना आरामात जिंकेल असं सर्वांनाच वाटलं होतं. पण, हसन अलीच्या एका चुकीमुळे सर्वांच्या आशा मातीमोल झाल्या. हसन अलीच्या याच चुकीमुळे भारतीय सोशल मीडिया यूजर्स खूप खूश दिसत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहायला मिळत आहेत.

Hassan Ali | हसन अलीच्या त्या चुकीने भारतीय खुश, म्हणाले मॅन ऑफ द मॅन तर हाच
Hassan Ali Memes
Follow us on

मुंबई : यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियासमोर पराभव स्विकारावा लागला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभूत होत पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. या सामन्यात एक क्षण असाही आला होता की पाकिस्तान हा सामना आरामात जिंकेल असं सर्वांनाच वाटलं होतं. पण, हसन अलीच्या एका चुकीमुळे सर्वांच्या आशा मातीमोल झाल्या. हसन अलीच्या याच चुकीमुळे भारतीय सोशल मीडिया यूजर्स खूप खूश दिसत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहायला मिळत आहेत.

हसन अलीची एक चूक पडली भारी

19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण, ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता.

आता हसन अलीच्या या कृतीनंतर तो सर्वात मोठा खलनायक असल्याचे सिद्ध झाले आहे. तेव्हापासून पाकिस्तानी चाहते त्याच्यावर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. हसन अलीवर अनेक प्रकारचे मीम्स पाहायला मिळत आहेत. काही त्यांच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. खाली व्हायरल होत असलेले मीम्स पाहा –

बाबर आझमला सामन्यानंतर पराभवाचा टर्निंग पॉईंट विचारण्यात आला तेव्हा त्याने हसन अलीचा कॅच सोडण्याचे मोठे कारण सांगितले. जर हसन अलीने हा झेल पकडला असता तर नवीन फलंदाज क्रीझवर आला असता आणि पाकिस्तानला सामना जिंकता आला असता, असे बाबरने म्हटले. बाबर आझमने हसन अलीविरोधात जाहीर वक्तव्य केले होते, त्यानंतर पाकिस्तानी कर्णधारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मीम्स शेअर करताना लोकांनी लिहिले, ‘अरे, मला वाटतं की आजचा ‘मॅन ऑफ’ ही पदवी हसन अली सरांसाठी आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आमच्या टीमचा अभिमान आहे! मनोरंजनासाठी धन्यवाद!’ तिसर्‍याने लिहिले, ‘गर्दा उडा दिए सर’, दुसर्‍याने लिहिले, ‘आपण त्याला सलाम करुया का? होय तो राजा आहे, हसन अली तू कमाल आहेस, भारत तुझ्यावर प्रेम करतो’

संबंधित बातम्या :

Video : लग्न समारंभात नवरीऐवजी नवऱ्याच्याच डोळ्यात अश्रू! व्हिडीओ व्हायरल

VIDEO: जेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची अडीच वर्षांची मुलगी फेसबुक लाईव्हच्या मध्ये येते! बघा हा मजेदार आणि भावपूर्ण संवाद